Husband affair with another woman : एका महिलेने आपल्या रिलेशनशिप आणि आपल्या पतीच्या फसवणूकीची एक अनोखी कहाणी शेअर केली आहे. त्या महिलेने असे काही लिहिले आहे की कधीकधी आपल्या आयुष्यात असे काहीतरी घडते ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. आपण अविवाहित किंवा विवाहित असलात तरीही खरे प्रेम आपल्याला कधीही धोका देऊ शकते. अशाप्रकारचे मत त्या महिलेने व्यक्त केले आहे. (Husband had an affair with another woman, then her husband, I got acquainted)
महिलेने दिलेली माहिती…
‘माझ्या आयुष्यात सुख आणि दु: ख एकत्र आले आहेत आणि माझे आयुष्य पूर्णपणे गोंधळलेले आहे. कामाच्या नावाखाली माझे पती रात्री तासन्तास फोनवर रहायचे. तो अचानक ऑफिसच्या ट्रिपला जात असे. मला त्याचा संशय होता की त्याचे कुठेतरी प्रेमसंबंध आहेत. पूर्वीसारखे तो माझ्याजवळ येत नसे. शेवटी, मी सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला.
मला प्रत्येकवेळी संशय होता की माझ्या नवऱ्याचे कुठेतरी प्रेमसंबंध आहेत. ज्या स्त्रीसाठी माझा नवरा मला फसवत आहे,ती कोण आहे हे मला पाहायचे होते. ती माझ्यापेक्षा लहान आहे का? ती माझ्यापेक्षा सुंदर आहे का? माझ्या मनात असे अनेक प्रश्न चालू होते. माझ्या लग्नात कोणतीही अडचण नव्हती. सर्व काही व्यवस्थित चालू होते. मग आता माझा नवरा मला का फसवत आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे.
‘एक दिवस मला कळले की माझे पती मला न सांगता सहलीवर गेले आहेत. मीसुद्धा त्यांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. माझा संशय खरा ठरला, माझ्या नवऱ्याचे संबंध ज्या महिलेशी होते, ती माझ्यापेक्षा सुंदर होती. ती आणि माझा नवरा कॅफेमध्ये बसले होते, आणि कितीतरी तास बोलत होते. मी दोघांना दुरूनच पाहात होते.
माझं लक्ष त्या महिलेच्या हाताकडे गेलं, तिच्या हातात लग्नाची अंगठी होती, सुरुवातीला मला धक्का बसला की माझ्या नवऱ्याने तिच्याशी लग्न केले असेल, परंतु शोध घेतल्यावर मला समजले की ती आधीच विवाहित आहे. मला त्याचे नाव सापडले आणि त्याचे सोशल मीडिया अकाउंटही सापडले. तिथे मी त्या बाईच्या नवऱ्याचे फोटोही पाहिले जो खूप देखणा होता.
बदला घेण्याच्या उद्देशाने मी तिच्या नवऱ्याचा नंबर मिळवला आणि त्याच्याशी बोलू लागले. थोडं बोलणं झाल्यानंतर मी त्याला घडलेली सर्व घटना सांगितली. तुमची पत्नी तुम्हाला फसवते, हे त्यांना सांगितलं. हे ऐकूण त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आम्ही हे सगळं फोनवर बोलत होतो, अखेर त्या दोघांना रंगेहात पकडण्याचं नियोजन आम्ही दोघांनी मिळून केला.
एके दिवशी जेव्हा माझे पती त्या महिलेला पुन्हा भेटायला गेले, तेव्हा मी तिच्या नवऱ्याला भेटायला बोलावले. आम्ही दोघे जवळच्या रेस्टॉरंटमध्ये भेटलो. तो अतिशय प्रेमळपणे माझ्याशी बोलत होता. मात्र, आपल्या पत्नीच्या अफेअरविषयी बोलल्यानंतर तो निराश झाला. या स्थितीत त्याला पाहून मलाही वाईट वाटले.
हळू हळू आमच्या दोघांमध्ये बोलणं, भेटणं वाढू लागलं. आम्हाला दोघांनाही एकमेकांची सवय होऊ लागली, आम्हाला आता आमच्या पार्टनरची गरज वाटत नव्हती. आमच्यात अनेक गोष्टी पुढे जात होत्या, त्यांना थांबवणं शक्य नव्हतं आणि ते थांबवणं मला नको होतं, जे आहे ते सुरु ठेवायण्यासाठी धडपडत होते, मात्र या सगळ्याचा शेवट खूप वेगळा झाला… (Husband affair with another woman)