Father of 35 Children : कधी सेक्स करून तर कधी सर्म डोनेट करणारा हा अमेरिकन अवलिया आहे केली गॉर्डी. केली गॉर्डीचा बिझनेस कोरोना काळातही भन्नाट चालत असे, गॉर्डीने एका ब्रिटिश टिव्ही स्काई न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अनेक भन्नाट किस्से त्याने सांगितले आहेत. (Father of 35 children in 29 years, sperm donor tells the story of abandonment in Corona)
गॉर्डी सध्या 29 वर्षांचा आहे आणि त्याने वयाच्या 22 व्या वर्षी स्पर्म डोनेट करायचं काम सुरु केलं होतं. लोकांना मदत करायला त्याला खूप आवडते, त्याचा मोबदला ही तो घेत नाही, मात्र स्पर्म डोनेट करण्यासाठी तो ज्या शहरात जाईल, त्या ठिकाणाचा सगळा खर्च तो आपल्या क्लाईंटला करायला सांगतो.
गॉर्डी सध्या अमेरिकेतल्या लॉस एंजिल्स शहरातील खासगी कंपनीमध्ये पार्ट टाईम नोकरी करतो. त्याच्या उरलेल्या वेळेत अनेकांना स्पर्म डोनेट करून मदत करतो.
मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे तो सध्या 35 मुलांचा बाप आहे, आणि ज्यांना गॉर्डीच्या स्पर्ममुळे मुलं झालेत, ते लोक आभार माणण्यासाठी गॉर्डीला त्यांच्या घरी बोलवत असतात.
कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगमुळे माझ्या स्पर्मच्या मागणीत वाढ झाली होती. अशीही माहिती त्याने मुलाखतीत दिली होती.
लोकांशी संपर्क कसा करतो?
केली गॉर्डी सध्या फेसबूकच्या माध्यमातून लोकांशी कनेक्ट आहे. अमेरिकेसाठी आणि जगातील इतर नागरिकांसाठी त्याने दोन फेसबूक ग्रुप सुरु केले आहेत. त्यातून तो गरजूवंत लोकांना शोधत असतो आणि मदत करण्यासाठी त्यांना संपर्क करत असतो.
ज्या ठिकाणी क्लाईंटला भेटण्यासाठी जायचं आहे, तिथल्या खर्चाचा ताळमेळ तो आधीच करतो आणि क्लाईंटला या सर्व खर्चाची कल्पना देतो. आपल्या स्पर्मच्या बदल्यात गॉर्डी क्लाईंटकडून एक रुपयाही घेत नाही, मात्र त्याबदल्यात तो तिथला सर्व खर्च क्लाईंटला करायचा सांगतो. (how does he communicate with people?)