Porn Addiction : अनेकजणांना पॉर्न व्हिडीओ पाहायची सवय असते. व्हिडीओ पाहण्याचं काहींचं प्रमाण जास्त असतं, तर काहींचं कमी असतं. मात्र यातून आपल्याला पॉर्न पाहायचं व्यसन तर लागलं नाही ना, असा सवालदेखील अनेकदा आपल्याला पडतो.
अमेरिकेतील तज्ज्ञांनी 100 तरुणांचा सर्व्हे केलाय. या सर्व्हेमध्ये त्या तरुणांना काही प्रश्न विचारले गेले. त्या प्रश्नांवर जेव्हा अभ्यास केला गेला, तेव्हा पॉर्न पाहण्याचं किती प्रमाणहे व्यसनामध्ये गणलं जातं हे ठरवण्यात आलं.
तुम्हाला पॉर्न पाहण्याची तिव्र इच्छा आहे का?
आपल्याला अनेकदा पॉर्न पाहण्याची तिव्र इच्छा होत असते. मात्र हे प्रमाण आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसांतून एकदा असेल तर ते व्यसन नाही. समोर चित्रपट सुरु असेल, त्यामध्ये किसींगचा सीन असेल आणि ते पाहून जरी तुम्हाला पॉर्न व्हिडीओची आठवण येत असेल, तर तुम्हाला ते व्यसन आहे, हे समजावं लागेल. (Do you have desire to watch porn?)
व्हिडीओ पाहताना मनात अपराधी भावना येते का?
पॉर्न पाहताना किंवा पाहून झाल्यानंतर आपण काहीतरी चुकीचं करताय किंवा केलय, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ती लक्षणे पॉर्न अॅडिक्ट असल्याचे समजले जाते. अनेकदा मनात ठरवूनही पॉर्न पाहण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखू शकत नसाल, तर ते व्यसन असल्याचे समजले जाईल. (Does watching video you feel guilty?)
साईटवर वेगवेगळे प्रकार सर्च करणे
तुम्ही एखाद्या पॉर्न साईटवर जाऊन दर मिनिटाला अनेकप्रकारचे व्हिडीओ सर्च करत असाल, व्हिडीओ पाहचाना चंचलपणा जाणवत असेल, तर तेे व्यसन समजलं जातं. अनेक विचित्र किवर्ड वापरून त्याप्रकारचे व्हिडीओ सर्च करणे, हे एका व्यसनापेक्षा कमी नसल्याचं तज्ज्ञ म्हणतात. (Searching for different types of porn sites)
आपल्या पार्टनरबद्दलची भावना
एकसारखे पॉर्न व्हिडीओ पाहल्यानंतर आपल्यालाही त्या व्हिडीओमधील पार्टनर हवा असल्याच्या भावना मनात येत असतात. आपल्या खर्या पार्टनरबद्दल असलेलं आकर्षण यामुळे निघून जातं, त्यावेळी संबंधित व्यक्तीला व्यसन लागल्याचे सिद्द केले जाते. (Feelings about your partner)
शरीर संबंध ठेवताना व्हिडीओतील गोष्टी फॉलो करणे
आपण आपल्या पार्टनरसोबत सेक्स करत असताना पाहिलेल्या पॉर्न व्हिडीओमधील पोजिशन फॉलो करत असतो, ते आपल्या पार्टनरला काहीदा खटकत असेल, तरीही ती गोष्ट न करण्यापासून आपण स्वत:ला जर रोखू शकलो नाही, तर ते एकप्रकारचे व्यसन समजले जाते. (Following things in the video while having body contact)
अशा सवयी तुमच्यात असतील तर त्या बदलणे काळाजी गरज आहे, नाहीतर भविष्यात सेक्स्यूअल लाईफबद्दल अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.