Demand of Girlfriend : गेल्या तीन वर्षांपासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. माझी गर्लफ्रेड खूप हुशार आणि चालाक आहे. ती आपलं काम सर्वोत्तम करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते, मात्र तिच्यात नेहमी एका गोष्टीची कमी आहे, जिच्याबद्दल मला नेहमी अप्रूफ वाटत असते.
एका तरुणाने https://slate.com/ वर आपली तक्रार नोंदवली आहे, आणि त्या माध्यमातून मदत मागितली आहे. आपली तक्रार त्याने या साईटच्या माध्यमातून लोकांसमोर मांडली आहे.
‘माझ्या गर्लफ्रेंडकडे सर्व चांगल्या सवयी आहेत, परंतू तिची एक सवय मला खूप विचित्र आणि वाईट वाटली. कोणतेही काम केल्यावर तिला माझ्याकडून कौतुक ऐकावेसे वाटते किंवा तिला त्या कामातील चुका ऐकायच्या असतात.
‘स्वयंपाक करण्यापासून, मला भेटवस्तू देण्यापर्यंत किंवा माझ्यासाठी कोणतेही काम करण्यापर्यंत, ती माझ्याकडून कौतूकाची अपेक्षा ठेवत असते. जर तिला तिच्या कामातील कमीपणा सांगितला नाही, तर ती चिडचिड करते, परंतू अनेकदा तिच्या कामात कुठलाच कमीपणा नसून ती कमीपणा सांगण्याची अपेक्षा ठेवत असते.
‘जेव्हा जेव्हा आम्ही सेक्स करतो तेव्हा मला तिच्याबद्दल नक्कीच काहीतरी सांगावे लागते, तिच्याबरोबर सेक्स करून कसं वाटलं किंवा त्यावेळस काय कमी होतं हे सगळं तिला सांगावं लागतं, परंतु मला त्यात कोणतीही कमतरता दिसत नाही. परिस्थिती अशी बनली आहे की आता मी भांडणे टाळण्यासाठी तिचे कौतूक करत असतो, किंवा तिच्यातल्या कमतरता सांगत असतो, असे मत प्रियकराने slate या साईटवर मांडलं आहे. (Demand of Girlfriend)
‘खरं सांगायचं तर त्यासाठी काय काम करण्याची गरज आहे, याची मी एक खोटी यादी तयार केली आहे. मी तिच्या कामाबद्दल अशा टीका करत नाही, ज्यामुळे ती पॅनिक होईल, परंतू तिला अशा गोष्टी सांगतो ज्यामुळे ती समाधान व्यक्त करेल. हळू हळू तिची सवय बदलण्यासाठी मीच तिला आता माझ्याबद्दल विचारत असतो. त्यावेळेस तिला काय बोलावं हेच सुचत नाही, मग ती मलाही आपल्या कामाबद्दल विचारणं टाळते. अशी माहिती संबंधित तरुणाने दिली आहे. (Strange Demand of girlfriend after sex, boyfriend asked for help from others)