Rape on GirlFriend हरियाणाच्या पलवलमध्ये 3 मे रोजी सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पीडित मुलीने 20 हून अधिक लोकांवर सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनंतर संपूर्ण हरियाणामध्ये पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. या सामूहिक बलात्काराचा मुख्य आरोपी महिलेचा फेसबुक मित्र आणि प्रियकर आकाश आहे. एकूण 25 जणांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.
सध्या पोलिसांनी आरोपी समुद्रसिंग याला 2 दिवसांच्या पोलिस रिमांडवर घेतले आहे, तर आधीपासून अटक आरोपी आकाशला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडित मुलगी आपल्या भावासोबत दिल्ली येथे राहत होती. फेसबुकच्या माध्यमातून तिची पलवलमधील रामगड गावात राहणाऱ्या आकाशसोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, मात्र तेच प्रेम त्यांच्या अंगलट येणार आले.
आकाशने आपल्या पालकांशी ओळख करून देण्याच्या बहाण्याने मुलीला आपल्या घरी म्हणजे पलवलला बोलवले. त्यानंतर तिला जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर आकाशच्या मित्रांनीही त्या तरुणीवर बलात्कार केला. जेव्हा महिलेची प्रकृती खालावली तेव्हा त्यांनीच तिला दिल्लीजवळच्या निर्जन जागी सोडून पळून गेले.
मुलीने पलवल पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बलात्कार केल्यानंतर तिला बदरपूर हद्दीत सोडून दिलं. त्यानंतर तिने आपल्या भावाला फोनवरून या घटनेची माहिती दिली. यानंतर 12 मे रोजी हे प्रकरण हसनूपार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केली आहे. (Rape on GirlFriend called to the village, 25 people raped her)