Bill Gates Love Story : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी लग्नाच्या 27 वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे. दोघांनीही आपले नाते संपवण्याची घोषणा केली आहे. (Bill Gates told Love Story Bill Gates and Melinda had a breakup)
27 वर्षे बराच काळ एकत्र घालवल्यानंतर, वयाच्या या टप्प्यावर अचानक घटस्फोट घेतल्यामुळे बरेच लोक आश्चर्यचकित होतात. बिल गेट्स आणि मेलिंडाच्या घटस्फोटापर्यंतची प्रेमकथा नेमकी कशी घडली, हेच पाहाणे गरजेचे आहे.
2019 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘इनसाइड बिल्स ब्रेन’ (Inside bill’s brain) या मालिकेत बिल गेट्सच्या खासगी आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
त्यात दाखवलेल्या माहितीनुसार मेलिंडा 1987 मध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल होते. बिझिनेस डिनर दरम्यान, बिल आणि मेलिंडाला यांच्यात भेट होते. त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढू लागतात.
मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत असताना मेलिंडाचे अनेक बॉयफ्रेंड असल्याची माहिती बिल यांना मिळाली. त्यामुळे सुरुवातीला बिल आणि मेलिंडा हे दोघे एकमेकांबद्दल गंभीर नव्हते आणि दोघांकडे एकमेकांसोबत घालवण्यासाठी वेळही नव्हता. मात्र भेटलेल्या एका वर्षानंतर त्यांच्यातील केमिस्ट्री बदलली.
एक दिवस बिलने अचानक मेलिंडाला प्रपोज केलं. मेलिंडानेही बिलला होकार दिला. यावर बिल म्हणतो की “आम्ही एकमेकांची खूप काळजी घेत होतो, त्यानंतर आमत्याच दोनच शक्यता होत्या, त्याम्हणजे एकतर आमचा ब्रेकअप किंवा लग्न होईल.
मेलिंडाने एकदा बिल यांच्या संदर्भातला अनोखा किस्सा सांगितला आहे. बिलला त्याच्या आयुष्यात लग्न करायचे होते पण तो संभ्रमात होता की लग्नाच्या जबाबदारीसोबतच तो मायक्रोसॉफ्ट चालवेल की नाही. या धावपळीतच 1994 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यावेळी बिल 38 वर्षांचे होते आणि मेलिंडा 29 वर्षांची होती.
या दोघांनाही तीन मुले आहेत. 1996 मध्ये मेलिंडाने त्यांची पहिली मुलगी जेनिफरला जन्म दिला. त्यानंतर 1999 मध्ये ती एक मुलगा रोरीची आई बनली आणि 2002 मध्ये आणखी एक मुलगी फोबे झाली. (Bill Gates Love Story)