Prostitution Job : लॉकडाऊन दरम्यान नोएडा पोलिसांनी सेक्टर -122 मधील एका घरात छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना अटक केली आहे.
अतिरिक्त पोलिस उपायुक्त (झोन II) अंकुर अग्रवाल म्हणाले की सेक्टर -122 मधील सी-ब्लॉकमधील एका घरात वेश्या व्यवसाय सुरु होता. सोमवारी रात्री (17 मे रोजी) पोलिसांनी छापा टाकून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी देह विक्रीतील मुख्य आरोपी आणि दोन महिलांसह दोघा ग्राहकांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत. सहायक पोलिस आयुक्त अब्दुल कादिर यांच्या नेतृत्वात छापा टाकण्यात आला.
चौकशी दरम्यान सत्य समोर (Prostitution Job)
लॉकडाऊनमध्ये महिलांची नोकरी गेली, त्यांच्यासमोर अनेक खर्च, भाडे, अशा अनेक गोष्टी सतावत होत्या. लॉकडाऊन दरम्यान त्या पूर्णपणे बेरोजगार झाल्या होत्या, त्यामुळे वेश्या व्यवसाय करण्याचं त्या महिलांनी ठरवलं. विविध माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना आपल्या घरी बोलवून त्यांच्यासोबत शरिर संबंध ठेवत असत. (Unemployed due to lockdown, started prostitution employment)