Women Want Sex बर्यााच स्त्रियांमध्ये वयानुसार लैंगिक संबंधाची आवड कमी होत असते. महिलांमध्ये असलेल्या सेक्स करण्याच्या इच्छेबद्दल नुकताच स्कॉट्सडेलच्या संशोधकांनी अभ्यास केला आहे.
मेयो क्लिनिकमधील अभ्यासाचे लेखक आणि असोसिएट प्रोफेसर ऑफ मेडिसिन डॉ. ज्युलियाना क्लिंग यांनी संशोधनात बरीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
डॉक्टर क्लींग यांनी स्त्रियांमध्ये झोपेची तीव्र इच्छा असल्याचं म्हटलं आहे. एका अभ्यासानुसार, लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी सर्वात वृद्ध वयात चांगली झोप घेणे गरजेची असते. संशोधकांच्या मते ज्या स्त्रियांना चांगली झोप येत नाही, किंवा त्या झोप घेऊ शकत नाहीत, अशांमध्ये लैंगिक समस्या होण्याची शक्यता दुप्पट असते.
हा अभ्यास 53 वर्षे वयोगटातील 3,400 हून अधिक महिलांवर केला आहे. यापैकी 75 टक्के स्त्रियांची झोप पूर्ण होत नसल्याची तक्रार होती, तर 54 टक्के महिलांना इतर लैंगिक समस्या होत्या.
अभ्यासामध्ये महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल बर्यासच गोष्टी विचारण्यात आल्या. अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या स्त्रिया चांगली झोप घेत नाहीत त्यांच्यामध्ये सेक्सचा अभाव आहे. त्या महिला अनेक दिवस सेक्स करू शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये तशी इच्छा होतही नाही.
अभ्यासामधील महत्त्वाचा मुद्दा (Women Want Sex )
ज्या महिला 24 तासांपैकी 5 तासही सलग झोप घेत नाहीत, अशांमध्ये अनेक लैंगिक अजार असल्याची माहिती समोर आली. डॉक्टर क्लिंग यांच्या मते ‘सेक्शुअल डिस्फंक्शन’ हादेखील एक लैंगिक आजार आहे. ज्याचा संबंध कमी झोपेशी आहे. यामुळे सेक्सची इच्छा, उत्तेजनाची कमतरता आणि खाजगी भागात वेदना यांसारख्या समस्या कमी झोपेमुळे होतात, हे नक्की.
डॉक्टर क्लिंग पुढेही म्हणतात की ‘चांगली झोप न घेतल्याने शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि नंतर तो थकवा आणि लैंगिक समस्यांमध्ये बदलतो. चांगली झोप घेतल्याने तुमची लैंगिक जीवनशैलीसुद्धा सुधारते. (For one reason, women do not want to have sex)