Sex with Partner : तुम्ही अशा जोडप्यांपैकी एक आहात का, की जे सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा सेक्स करता? असाल तर ही बातमी तुम्ही वाचणे गरजेची आहेत, पण तसं न करणाऱ्यांनाही ही माहिती फायदेशीर ठरू शकते. (don’t want to have sex with partner, read the main reason)
तुम्हाला अनेकदा तुमच्या पार्टनरसोबत सेक्स करण्याची इच्छा का होत नाही, याचं मुख्य कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वैवाहिक जीवनात लैंगिक संबंध खूप महत्वाचे असतात; भावनिक आणि शारीरिकरित्या एकमेकांशी जोडण्याचं काम सेक्स करत असतो. प्रेमासोबतच सेक्सदेखील दोन जीवांना एकत्र घट्ट जोडते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्या नात्यात जवळीकता कमी होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. आपल्यासाठी काह क्षुल्लक कारणे असतात जी आपल्या मोठ्या समस्येचे कारण बनू शकतात.
कॉमन रिजन
पुरुष आणि स्त्रियांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं एकमेव कारण आहे. ते म्हणजे कामाचा ताण, रोज बदलणारं शेड्यूल आणि कधीकधी आपल्या पार्टनरप्रति असलेली चिंता. आपण अनेकदा आपल्या पार्टनरबद्दल अनेक चुकीचे विचार मनात आणतो, ज्यामुळे आपल्यात होणाऱ्या सेक्समध्ये बदल होऊन जातो.
आर्थिक समस्या
अनेकदा आपण भविष्यात येणाऱ्या अनेक गोष्टींमुळेदेखील सेक्स करण्यासाठी टाळाटाळ करतो. असुरक्षितता हे एक प्रमुख कारण माणले जाते, सेक्स करण्यापासुन रोखणारे. ज्यामुळे आपल्यात ताणतणाव वाढण्यास सुरुवात होते. भविष्यात होणाऱ्या मुलांचा विचार करून आपण अनेकदा सेक्स करणं टाळतो. मात्र अशांना निरोधक सारख्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नसते.
छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन होणारे वाद, भांडणे, चिडचिड अशा अनेक गोष्टींमुळे पार्टनरविषयी आकर्षण कमी होत जाते. याचा अर्थ ते आकर्षण दुसऱ्यासोबत होते, असं नाही. काहीदा आकर्षण निघूनही जाते. त्यामुळे प्रत्येकांच्या नात्यांमध्ये समतोल असणे गरजेचे आहे. प्रेम, जिवाळा, भावनिकता, सेक्स असा गोष्टींनी आपलं आयुष्य सजणे गरजेचे आहे. (Sex with Partner)