Sex During Periods : पीरियड्स दरम्यान सेक्स करताना अनेक फायदे आणि तोटेदेखील आहेत. आज आम्ही तुम्हाला तेच फायदे आणि तोटे सांगणार आहोत.
पीरियड्स दरम्यान लैंगिक संबंध ठेवण्यात कोणतीही समस्या नाही. हे आपल्या जोडीदारावर अवलंबून आहे. जर आपल्याला पीरियड्स दरम्यान शारीरिक संबंध ठेवताना कोणतीही अडचण येत नसेल आणि आरामदायक वाटत असेल तर आपण सेक्स करू शकतो, मात्र जर महिला पार्टनरला आरामदायी वाटत नसेल तर सेक्स टाळणे, हेच योग्य ठरेल. (sex during periods benefits side effects and pregnancy)
पीरियड्सच्या वेळी लैंगिक संबंध ठेवणे थोडेफार सुरक्षित आहे. मात्र कधीकधी पीरियड्स दरम्यान लैंगिक संबंध ठेवणे चुकीचे ठरू शकते. आपण याबद्दल आपल्या जोडीदाराशी बोलू शकता. जर आपल्याला पीरियड्स दरम्यान लैंगिक संबंध हवे असतील शॉवरच्या खाली थोडा वेळ सेक्सचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे महिलेला वेदना कमी होतील.
सेक्स केल्यानंतर अनेकदा मासिक पाळीच्या दुखण्यापासून मुक्तता मिळते. मासिक पाळीच्या वेळी सेक्स केल्यानंतर अनेक महिलांच्या पोटामध्ये दुखणे कमी होते. सेक्सवेळी गर्भाशयाचे स्नायू संकुचित होतात, मासिक पाळीपासून थोडा आराम मिळतो. अशा परिस्थितीत आपले ऑर्गेसम्स एंडोर्फिन रिलीज करतात, ज्यामुळे आपल्याला बरं वाटते.
सेक्स दरम्यान लुब्रिकेंट (तेल वापरणे) वापरणे अजून आनंददायक वाटू शकते. त्यामुळे सेक्स दरम्यान महिलांना होणारा त्रास कमी होईल.