KamaSutra help for sex : जेव्हा पती-पत्नी एकमेकांना वेळ देण्यास असमर्थ असतात तेव्हा कुठल्याप्रकारे तुम्ही सेक्स करू शकता किंवा खासगी वेळ घालवू शकता, हेच आम्ही आजच्या लेखाच सांगणार आहोत. कामसुत्रात दिलेल्या गोष्टींचा अवलंब करून एका जोडप्याने त्यांचे लैंगिक आयुष्याची कहाणी शेअर केली आहे. (guide to the pleasures and techniques of sex)
सेक्स ही विवाहित जीवनाची खूप मोठी गोष्ट आहे. पण आजच्या ब्युझी शेड्यूलमुळे आयुष्यात नोकरी करणार्याट जोडप्यासाठी रोज सेक्स करणे शक्य नसते. कार्यालयीन कामाचा दबाव, घरातील जबाबदाऱ्या, नातेवाईकांमधील वावर, स्वतःचे आरोग्य अशा बर्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात, ज्यामुळे लोक आपल्या दैनंदिन कामात लैंगिक गोष्टी समाविष्ट करू शकत नाहीत.
अशा परिस्थितीत जेव्हा नवरा-बायको एकमेकांना वेळ शोधू शकत नाहीत तेव्हा त्यांचे लैंगिक जीवन आकर्षक बनवण्यासाठी त्यांनी कोणत्या पद्धती अवलंबल्या आहेत, हेच पाहणे गरजेचे आहे.
“कामसूत्र” हे पूर्वजांपासून चालत आलेला कानमंत्र समजला जातो. यामध्ये वर्णन केलेल्या गुणदोषांचा अधुनिकतेशी संबंध आहे. आपल्या ब्युझी शेड्यूलमध्ये कामसुत्राची आपल्याला गरज असल्याचे अनेकदा स्पष्ट झालं आहे.
महिलेने शेअर केला अनुभव
आमच्या व्यस्त शेड्यूलमुळे आम्हा दोघांनाही वेळ मिळणे खूप अवघड वाटत होते. आम्ही दोघांनी एकमेकांशी बराच वेळ घालवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जमत नव्हते. जणू आपण आपली जवळीक गमावत आहोत असं वाटत असते. मी 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सेक्स केल्याचे मला आठवत नाही.
आम्ही सेक्ससाठीही कमी वेळ काढू शकत होतो आणि ही गोष्ट आता आम्हाला खूप त्रास देत होती. आणि माझ्या सोशल मीडिया फीडवरून स्क्रोल करीत असताना मला लैंगिक जीवन सुधारण्यासाठी कामसूत्र तंत्रांची यादी मिळाली आणि या विषयाने मला चकित केले.
मी माझ्या नवऱ्याशी याबद्दल चर्चा केली आणि आम्ही दोघांनी प्रयत्न करून पहाण्याचा प्रयत्न केला. आम्ही उत्साही होतो, परंतु शतकानशतकाचा प्राचीन मजकूर आपल्या लैंगिक आयुष्यात कशी मदत करू शकतो, याबद्दल देखील गोंधळ होता. पण, जे झालं ते योग्यच झालं.
या संदर्भातील बर्यायच स्क्रिप्ट्स ऑनलाइन उपलब्ध आहेत आणि काही लैंगिक पोझिशन्स पाहिल्यानंतर आम्ही आमच्या बेडवर च्या आजमवण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व लैंगिक पोझिशन्स करणे काहीसे अवघड होते, तरीही आम्ही ते करण्यास तयार होतो. ते करून आम्हाला मिळालेला आनंद शब्दांत वर्णन करता येत नाही. आणि त्या पहिल्या अनुभवानंतर, अधिक आरामशीर मार्गाने सेक्स कसे करावे यासंबंधी अशा अधिक टिप्स मिळवण्यासाठी आम्ही सर्च करण्यास सुरवात केली. आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनही स्वीकारला आणि आमचे लैंगिक जीवन सुधारले. (Kama Sutra: A Tale of Love)