Sex Drive Foods : अनेक महिला आणि पुरुषांना चॉकलेट खायला खूप आवडत असते. मग ते चॉकलेट आइस्क्रीम, चॉकलेट केक किंवा चॉकलेटपासून बनवलेली कोणतीही गोष्ट असू शकते. लोकांना चॉकलेट खूप आवडीने खायला आवडते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की चॉकलेट खाल्याने लैंगिक संबंधासाठीही अनेक फायदे होऊ शकतात. (You also eat chocolate before sex)
काही संशोधनात चॉकलेट आणि सेक्स यांच्यातील संबंध खूप जवळचा आहे. मुलींना चॉकलेट खूप आवडते. एका संशोधनात असेही आढळून आले आहे की महिला चॉकलेटला सेक्सचाही भाग म्हणून माणतात.
काही संशोधनात असे आढळले आहे की डार्क चॉकलेट खाल्ल्यास कोणत्याही व्यक्तीमध्ये प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, अशी माहिती आहे की चॉकलेटमध्ये आत फिनाइल एथिलॅमिन नावाचे एक रसायन असते. त्याला लव्ह केमिकल देखील म्हणतात. हे केमिकल आपल्या शरीरात डोपामाईनसारखे हार्मोन्स तयार करते.
असेही मानले जाते की पुरुषांनी सेक्स करण्यापूर्वी चॉकलेटचेही सेवन केले तर त्यांच्यामध्ये स्टॅमिना वाढतो. जास्त काळ सेक्स करण्याची ताकद पुरुषांमध्ये येते. म्हणजेच, चॉकलेट खाणे पुरुषांच्या लैंगिक संबंधासाठी खूप चांगली गोष्ट आहे.
चॉकलेटमध्ये असलेले कोको आपल्या शरीरासाठी चांगले असते. त्यामुळे रक्त प्रवाह वाढतो. जेव्हा आपल्या शरीरात रक्ताचा प्रवाह चांगला असतो, तेव्हा आपण अधिक निरोगी असतो. लैंगिक संबंध ठेवताना आपल्या शरीराचे रक्त परिसंचरण होणे खूप महत्वाचे असते. ज्या व्यक्तीचे रक्त परिसंचरण खूप चांगले होते, ते समागम करणे चांगले मानले जाते. म्हणजेच सेक्सपूर्वी चॉकलेट खाणे खूप फायदेशीर आहे.
महिलांसाठी चॉकलेट देखील खूप फायदेशीर आहे. महिला लैंगिक संबंधाआधी चॉकलेट खाऊ शकतात. त्यांच्यासाठीच हे चांगले आहे, कारण ते चॉकलेट खाल्ल्याने अधिक आनंदित असतात. स्त्रियांनी डार्क चॉकलेट खावे, कारण यामुळे त्यांना खूप बरं वाटत असतं. काही संशोधनात असे दिसून आले आहे की जेव्हा महिला चॉकलेट खाल्ल्यानंतर लैंगिक संबंध ठेवतात तेव्हा त्यांच्यांमध्ये चांगले ऑर्गेनिजम निर्माण होतात.
महिलांसाठी मूड तयार करण्यासाठी चॉकलेट देखील खूप फायदेशीर आहे. सामान्यत:, बहुतेक पुरुष आपल्या साथीदारांना खूष करण्यासाठी चॉकलेट देतात. असेही मानले जाते की जेव्हा स्त्रिया चॉकलेटचे सेवन करतात तेव्हा अधिक उत्साही होतात. परंतु दररोज चॉकलेट खाऊ नये, कारण जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. चॉकलेटमुळे आपल्या शरीरात साखरेची पातळीही वाढते. म्हणून, चॉकलेटचे जास्त सेवन करू नका, परंतु आठवड्यातून एकदा चॉकलेट खाण्यास काहीच हरकत नाही.