CONDOM : कोंडोमचा वापर नेहमीच आपली सेक्युअल लाईफ व्यवस्थित राहण्यासाठी करत असतो. आपली पिढी निरोगी राहण्यासाठी आणि प्रजनन व्यवस्था ठीक राहण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. मात्र भारतात याच्या उलटं होतं असतं, आता असं का होतं, तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. (CONDOM is rarely used in India what people feel while sex )
भारताची लोकसंख्या जगाच्या पाठीवर आघाडीवर आहे, त्यामुळे इथल्या पॉप्युलेशन कंट्रोलवर जरी प्लॅनिंग करायचा झाला, तरी इथे लोकांच्या असलेल्या अनेक गैरसमजुतीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकांना अद्यापही कोंडोम वापरणाऱ्यावर गैरसमजूती आहेत.
बाजारपेठेतील कंडोम उत्पादक क्षमता, पुरवठादारांची माहिती आणि ‘कंडोम अलायन्स’ने पुरवलेल्या आराखड्यानुसार एक सर्व्हे करण्यात आला. या सगळ्यावरून भारतात अनेक जण कंडोम वापर नसल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. मात्र याचा एकमेव तोटा म्हणजे अनियोजित गर्भधारणा, असुरक्षित गर्भपाताचा मार्ग, लैंगिक संबंधातून पसरणारे आजार अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत.
लग्नाआधी सेक्सच्या प्रमाणात वाढ
कंडोमोलॉजी सर्वे करताना आणखी एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे लग्नाआधी सेक्सच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आली आहे. भारतात 25 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुण तरुणींचं प्रमाण जास्त आहे, अशांमध्ये योग्य मार्गदर्शन नसल्याने लग्नाआधी सेक्स करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 20 ते 24 वयोगटातील 80 टक्के तरुण सेक्स करताना कंडोम वापरत नसल्याची गोष्ट सर्व्हेमधून समोर आली आहे, मात्र अशा तरुणांच्या भविष्यासाठी ही गोष्ट हानीकारक असल्याचंही म्हटलं जात आहे.
काय असतात भावना?
- मेडिकलमध्ये कोंडोम मागायचा कसा, त्यावेळी समाज काय म्हणले.
- कोंडोम वापरल्यास सेक्स केल्याची भावना निर्माण होत नाही, काहीदा सेक्स केल्यासारखंही वाटत नाही.
- कोंडोम वापरल्यास शरिराच्या भागांवर काही परिणाम तर होणार नाही ना?
- सेक्स करताना कोंडोम फाटण्याचीही शक्यता असू शकते, त्यावेळेस काय करायचं?
- कोंडोम खरच प्रोटेक्टर म्हणून काम करतो का?
- अशा अनेक गोष्टींचा विचार मनात येत असल्याने भारतात कोंडोम वापरण्याचं प्रमाण कमी आहे, मात्र हे प्रमाण वाढणं खूपच गरजेचं आहे.