Cheating in love : प्रेम प्रकरणातील अनेक गोष्टी अशा घडत असतात ज्या ऐकल्या की आपल्याला हसू आवरत नाही किंवा अनेकदा अजब वाटतं. अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये. (Boyfriend was marrying another girl, girlfriend messed up)
जर तुम्हाला समजलं की तुमच्या गर्लफ्रेंडचं किंवा बॉयफ्रेंडचं लग्न ठरलं आहे किंवा लग्न होत आहे, तर तुम्ही काय कराल? जास्तीत जास्त त्या व्यक्तीला फोन करून जाब विचारण्याचा प्रयत्न कराल, जास्तीत जास्त ओरडाल किंवा शिव्या द्याल, मात्र इथे काही वेगळंच घडलं आहे.
जेव्हा गर्लफ्रेंडला समजलं की आपला बॉयफ्रेंड इतर दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे, त्यावेळेस या महोदया थेट बँड, बाजा, बारात घेऊन बॉयफ्रेंडच्या घऱासमोर पोहोचल्या आहेत आणि सुरु झालं कित्येक तासांचं हाय व्होल्टेज भांडणं.
आपल्या प्रियकराशी लग्न झालं नाहीतर मी आत्महत्या करेन, अशी धमकीदेखील हा धाडक गर्लफ्रेंडने दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली आणि मुलीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तरी तिला घरी पाठवण्यात आले आहे.
संदीप मौर्य हा आर्मीमध्ये आहे. त्याचे तिथल्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते, असं असतानाही तो इतर मुलीशी लग्न करत होता, घऱचेही त्याचं लग्न दुसरीकडे लावून देत होते, त्याच्याविरोधात तरुणी आक्रमक झाली आणि संपूर्ण राडा घातला.
त्या गर्लफ्रेंडचे म्हणणे आहे की दोन वर्षांपासून त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. तो तिच्या घरीही येत असायचा. लग्न करण्याचा विश्वास दाखवून त्याने अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. दरम्यान, त्याच्या सैन्यात प्रशिक्षण सुरू झाले. सैन्यात सैनिकाची नोकरी मिळवल्यानंतर त्याने लग्नापासून माघार घेतली. मात्र त्याने अचानक लग्न केल्यानंतर गर्लफ्रेंडने राडा घातला. आता त्याच्याशीच लग्न झालं नाही तर ती तिच्या घरासमोरच जीव देईल, अशी धमकीही तिने दिली आहे.