Crime News : ही घटना आहे बंगालच्या अलीपुरद्वार शहरातील. एका हॉटेलच्या खोलीत पतीने आपल्या पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत पकडलं, त्यामुळे खूपच मोठा दंगा झाला होता. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यावर आपली पत्नी अज्ञात व्यक्तीसोबत अश्लिल चाळे करत असल्याचं समोर आलं आणि नंतर संपूर्ण राडा घातला. (The wife’s voice was coming from the hotel room, the door was opened and exposed)
बुधवारी 2 जूनरोजी अलिपुरद्वार चौपाटीतील एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये ही घटना घडली. स्थानिक लोकांकडून होणारी गदारोळ आणि घटनेची माहिती मिळताच अलीपुरद्वार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला.
माझ्या नवऱ्यानेच मला हॉटेलमध्ये पाठवले होते, आणि या व्यक्तीसोबत चाळे करण्यास सांगितले, सोबतच अश्लिल फोटो काढण्यास सांगितले, जेणेकरून त्याला ब्लॅकमेल करायचं होतं, म्हणून मी या व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये आले, अशी माहिती संबंधीत महिलेने पोलिसांना दिली.
पण नवऱ्याचं मतही जाणून घेणं आता खूप गरजेचं आहे. पत्नीच्या अशा वागण्यामुळे कुटुंबात सतत भांडणं होती. मी बर्याच दिवसांपासून हिचा पाठलाग करत होतो, आज सकाळी ही जेव्हा घराबाहेर पडली, त्यावेळेस मी तिला फॉलो करत होतो, ती या हॉटेलमध्ये घसली तेव्हा मला संशय आला, म्हणून मी माझ्या मित्रांना इथे बोलवलं आणि हॉटेलवर धाड टाकली. तेव्हा हा प्रकार समोर आला. (wife voice cone from hotel room, sex racket exposed police crime News)
या प्रकरणात कांचनजंगा हॉटेलचे मालक राजदीप घोष, हॉटेल मॅनेजर विपुल कर आणि हॉटेलच्या आणखी एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.