Virginity Necessary : व्हर्जिन सेक्स म्हणजे पहिल्यांदा सेक्स करणे. परंतु, व्हर्जिनिटी सेक्स (कौमार्य हरवणे) याबद्दल लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. व्हर्जिनिटी आहे का (lose virginity) हा प्रश्न नेहमीच एका मुलीसाठी अनेकजण विचारत असतात. समाजात कौमार्य हा शब्द फक्त मुलींसाठी वापरला जातो. पण असं का, हे कितपत योग्य या सगळ्या गोष्टींवर आज माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
व्हर्जिन सेक्सबद्दल, लोकांचा असा विश्वास आहे की पहिल्यांदा सेक्स करताना महिलांना जास्त वेदना जाणवतात आणि त्यांच्या योनीतून रक्तही येते. पण तुम्ही ज्यावेळेस सेक्स करता आणि सेक्स करताना रक्त येणे किंवा वेदना होणे असं काहीच झालं नाही, तर समाज तसेच तिचा पुरुष जोडीदार तिला कुमारिका मानण्यास म्हणजेच व्हर्जिन नसल्याचा शिक्कामोर्तब देतो. (How virginity is important?)
प्रत्येकाचा अनुभव वेगळा
बर्याच लोकांना पहिल्यांदा संभोग करताना वेदना जाणवते किंवा योनीतून किंवा गुद्द्वारातून रक्तस्त्राव होतो किंवा खाजगी भागास सूज येण्यासारख्या गोष्टी घडत असतात. अशा परिस्थितीचे अनेक अनुभव येत असतात. मात्र अनेकदा लोकांना पहिल्यांदा सेक्स करताना अशा कोणत्याच गोष्टींचा अनुभव आलेला नसतो. म्हणजेच, जर तुम्ही व्हर्जिनिटीवर विश्वास ठेवत असाल तर असे अनुभव न आल्याने तुम्ही सेक्सच्या दरम्यान नाराज होऊ जाता.
काय आहे प्रकरण
स्त्रियांच्या योनीमध्ये खूप पातळ पडदा असतो. म्हणजेच तुमच्या कानातील पडद्यापेक्षाही खूपच पातळ. त्या पडद्याला योनीपटल (Vagina) म्हणतात. किशोर वयात किंवा पुढे ही तो कधीकधी धावणे, पोहणे, सायकल चालवणे या क्रियांमुळे फाटू शकतो. तो पहिल्या संबंधांच्या वेळेसच फाटायला हवा अशी काही आवश्यकता नाही. लिंग योनीत प्रवेश करून झालेल्या लैंगिक संबंधात वीर्य स्त्री बीजाच्या शोधात पुढे जातेच आणि गर्भधारणा होण्याचा संभव असतोच. जर हा पडदा फाटला नाही, तर पुरुषाचे विर्य योनीमध्ये जाण्यापासून रोखलं जावं म्हणून हा पडदा असतो. (Girl’s body after losing virginity?)
धावणे, पोहणे, सायकल चालवणे, अतिक्रिया करणे अशावेळी जर हा पडदा फाटला, तर अनेक महिलांना ती गोष्ट समजूनही येत नाही, त्यामुळे प्रत्येक पुरुषाने आणि महिलांनीही व्हर्जिनिटीला किती महत्त्व दिलं पाहिजे हे ठरवावं. (Are you still a virgin?)
धावपळीच्या युगात महिलांनीही सहभाग घेतला आहे, त्यात लहान वयातूनच सेक्सूअल शिक्षण मिळत असल्याने सेक्स म्हणजे काय याची माहिती आपल्याला खूपच कमी वयात मिळत असते, शारिरीक आकर्षण, महिलांना पुरुषांचे, पुरुषांना महिलांचे आकर्षण असणे, त्याची कारणे या सगळ्या गोष्टी लहान वयापासूनच आपल्यावर परिणाम करत असतात, त्यामुळे लग्नाआधी आकर्षणासह सेक्सच्याही प्रमाणांमध्ये वाढ झालेली असते. हे एक अजून कारण होऊ शकतं की लहान वयात आपली व्हर्झिनिटी गायब होऊ शकते. (What is considered losing your virginity?)