Sex During Menstruation : एका 35 वर्षीय महिलेने एका सेक्सॉलॉजिस्ट बरोबर आपला अनुभव शेअर केला. त्यावेळी तिने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता, तो म्हणजे की तिच्या नवऱ्याला मासिक पाळीच्या वेळीसुद्धा सेक्स करण्याची इच्छा होत असते, काहीदा तिचा नवरा या दरम्यान जबरदस्तीने सेक्स करत असतो. त्यावेळी त्या महिलेला सेक्सॉलॉजिस्टने दिलेलं उत्तर भन्नाट होतं.
उत्तरः जर एखाद्या महिलेला मासिक पाळी आली असेल आणि त्यादरम्यान तुमची सेक्स करण्याची इच्छा झाली, तर वैद्यकीयदृष्ट्या त्यात कोणतीही समस्या नाही. काहीवेळा काही जोडपी मासिक पाळीच्या दरम्यान संभोग करणे पसंत करतात. वास्तविक, पिरीएड्सच्या दरम्यान स्त्रियांच्या योनीमध्ये जास्त ओलावा निर्माण झालेला असतो, त्यामुळे त्यावेळेच्या सेक्सला त्या अधीक एन्जॉय करू शकतात. (You also have sex during menstruation)
इतकेच नाही मासीक पाळीच्या दरम्यान सेक्स केलात तर गर्भवती होण्याची शक्यताही खूपच कमी असते. या व्यतिरिक्त जेव्हा मासिक पाळी दरम्यान संभोग केलात तर तुमची कंबर, मांड्या, बेंबीच्या खालचा भागाला खूपच कमी वेदना होत असतात.
मात्र एक गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या की पाळीच्या दरम्यान जर तुम्ही सेक्स करणार असाल तर यावेळी जेवढी सहमती पुरुषाची गरजेची असले, त्यापेक्षा जास्त पसंती स्त्रीची असणे गरजेचे आहे. कारण सेक्स ही एकमेकांच्या विरुद्ध करण्याची प्रक्रिया नाही, तर ती दोघांच्या मर्जीने एकमेकांना दिलेलं सूख आहे.