Sex During Pregnancy : डॉक्टरांचे म्हणणे आहे की प्रेग्नेंसिच्या कोणत्याही अवस्थेत सेक्स करण्याचा कोणताही धोका नाही. जर गर्भधारणेदरम्यानही आपल्या जोडीदारासोबत सेक्स करायचे असेल, तर फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
गर्भवती महिलांनी गर्भवती झाल्यानंतर खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. त्यांच्या एका चुकीमुळे अवांछित गर्भपात होऊ शकतो. कदाचित हेच कारण आहे की लोक गर्भधारणेदरम्यान सेक्स करण्यास टाळाटाळ करतात किंवा अनेक लोक घाबरतात. (Whether it is right or wrong to have sex during pregnancy)
प्रेग्नेंसिच्या दरम्यान सेक्स केल्यास न जन्मलेल्या मुलासाठी धोका निर्माण होतो, अशीदेखील काहींची समज आहे. त्यामुळे अनेकजण गर्भधारणेच्या तीन महिन्यांनंतर सेक्स करण्याची प्रक्रिया थांबवतात. मात्र अशा करण्यासाठी अभ्यासक पुर्णपणे विरोध करतात.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की प्रेग्नेंसी असलेल्या महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल्स बदल घडतात आणि या वेळी महिला जोडीदाराच्या मनात सेक्सची इच्छा सर्वाधिक असते. हे खरं आहे की गर्भधारणेदरम्यान काही स्त्रियांसाठी लैंगिक संबंध अधिक आनंददायक असतात. डॉक्टर म्हणतात की लैंगिक संबंध केवळ लैंगिक सुखच नाही तर जोडीदाराशी अधिक चांगले संबंध जोडण्याचा एक मार्ग देखील आहे. अशा स्थितीत महिलांच्या शरीरावर रक्ताचा प्रवाह खूप वेगवान असतो आणि सेक्स ड्राइव्हही वाढते. हेच कारण आहे की ते सेक्सचा जास्त आनंद घेतात.
सेक्स न करण्याच्या अफवांना घाबरण्याऐवजी त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की प्रेगेन्सेंच्या कोणत्याही वेळी लैंगिक संबंध ठेवण्याचा कोणताही धोका नाही. प्रेग्नेंसीच्या कोणतीही समस्या नसल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. गर्भपात किंवा जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्यास डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
जर प्रेग्नेंसी दरम्यानही आपल्या जोडीदारासह सेक्स करायचे असतील, तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सेक्स करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वच्छता राखावी लागेल. सेक्स करताना कंडोम वापरण्यास विसरु नका. जर कंडोम वापरत नसाल तर गर्भधारणेचा धोका वाढू शकतो. जर आपण गरोदरपणात सेक्स करत असाल तर जोडीदाराच्या आरामाची आणि तिच्या स्थितीची काळजी घेतली पाहिजे…