Having Sex : पती-पत्नीच्या असो किंवा प्रेमसंबंध असो, नात्यांसाठी सेक्स खूप महत्वाची गोष्ट असते. नातं अधिक घट्ट होण्यासाठी सेक्सचे खूप योगदान आहे. परंतु सेक्स करताना आपण अशा काही गोष्टी करून बसतो, त्यामुळे आपला सगळा सेक्सचा मूड खराब होतो. (Never do these 5 things while having sex)
सेक्सच्या रात्री किंवा सेक्स करताना आपल्या जोडीदाराशी आपण कसे बोलतो किंवा पार्टनरसोबत कसे वागतो, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण सेक्स दरम्यान आपल्या जोडीदाराला कधीच बोलू नये, त्या कोणत्या आहेत, हेच आपण पाहाणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत जो तुमच्या जोडीदाराबरोबर सेक्स करताना कधीच बोलू नये. अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या सेक्स दरम्यान आपल्या जोडीदाराला सांगाव्याशा वाटतात, परंतु त्या सर्व गोष्टी आपल्या जोडीदारास दुखवू शकतात, जोडीदाराचा मूड खराब करू शकतात. म्हणून आपण बर्याच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रत्येकवेळी एकाच पद्धतीने सेक्स करताना आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे आपण थेट सेक्स करण्यासच नकार देतो. असं केल्यास आपल्या जोडीदाराला राग येण्याची शक्यता आहे, त्यामुळे जोडीदाराचं सेक्सवरून मन उडू शकतं, त्यामुळे प्रत्येकवेळी नव्या पद्धतीने सेक्स करणे गरजेचे आहे.
दिवसभर तुम्ही कुठे ना कुठे काम करून थकून आलेला असता, मात्र आपल्या जोडीदाराचे मन राखण्यासाठी सेक्स करण्यसाठी तयार झालेला असता, याच दरम्यान अचानक तुमच्या तोंडून शिवी निघते, किंवा दिवसभरातला कुठला ना कुठला राग बाहेर पडतो, अशावेळी आपला जोडीदार दुखावण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे तुम्ही सेक्स करताना दिवसभराचा राग, दगदग, मनस्ताप, कंटाळा या सगळ्या गोष्टी विसरून जा.
आपण सेक्स करताना चुकून आपल्या तोंडून जुन्या मित्र किंवा मैत्रिणीचे नाव निघाले, तर ती तुमची खूप मोठी चूक असू शकते, चुकूनही तुम्ही ही चूक कधीच करू नका. सेक्स करताना तुम्ही चुकून जरी तुमच्या मैत्रिणीचे नाव घेतले तुमच्या पार्टनरचा मूड ऑफ होऊ शकतो. याचा तुमच्या नात्यावर खूप वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
अनेकांना नशा करून सेक्स करण्याची सवय असते. बहुतेक लोक दारूच्या नशेत सेक्स करत असतात किंवा नशा करत करत सेक्स करत असतात. परंतु असं केलात तर आपल्याकडून अनेक गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. जर दोघेही नशेमध्ये असतील तर काहीदा अशा चुका लक्षात येत नाही, मात्र पुरुष नशा करून काहीही बडबडत सेक्स करत असेल तर मात्र तुमची पार्टनर नाराज होण्याची शक्यता आहे.
असे बरेच लोक असतात, ज्यांना वाटतं की आपण आज चांगल्याप्रकारे सेक्स केला नाही, तर असे लोक लगेचच जोडीदाराची माफी मागतात. मात्र तुम्ही चुकूनसुद्धा माफी मागू नका, त्याऐवजी जास्तीत जास्त चांगला सेक्स करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा जोडीदार तुम्हाला योग्य साथ देईल. जर तुम्ही सेक्स करून पार्टनरला समाधान करत नसाल तर दुसऱ्या मार्गांनी जोडीदाराचे समाधान करण्याचा प्रयत्न करा.
आपण सेक्स करताना कॉल उचलला तर आपल्या जोडीदाराला ते अजिबात आवडणार नाही. जरी तो आपल्या बॉसचा कॉल असेल. तुम्ही सेक्सच्या पूर्ण उत्कंठेला आला आहात, आणि एखाद्या फोन आला आणि तो तुम्ही अटेंड केला, तर ते तुमच्या जोडीदाराला नाराज करण्यासाठी पुरेसे आहे,
त्यामुळे सेक्स करताना आपल्या जोडीदाराचा विचार जरुर करा, जेणेकरून तुमच्या सेक्समधील वेळ अती चांगला जाईल, आणि तुम्ही योग्यरित्या सेक्स करु शकाल.