Masturbation : अनेक लैंगिक तज्ञ हस्तमैथुन करण्याची शिफारस करतात, परंतु याची सवय लागल्यास केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर आपले भविष्यातील शारिरीक संबंधही खराब होऊ शकतात. एवढेच नव्हे तर ते आपण चार चौघात वावरत असतानाही हस्तमैथुनचे परिणाम हस्तक्षेप करू शकतात. हस्तमैथुन अशाच काही गोष्टींबद्दल आपण आज बोलणार आहोत. (How many times a day do they masturbate?)
जर आपल्याला हस्तमैथुनचे व्यसन लागल्यास कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करणे कठीण होईल. आपले शरीर वारंवार आणि पुन्हा हस्तमैथुन करण्यासाठी आपल्यास उस्फुर्त करेल, त्यानंतर प्रत्येकवेळी आपल्याला हस्तमैथुन करावंसं वाटेल, त्यानंतर हस्तमैथुनशिवाय कुठलच काम सहज आणि सोप्प करू शकणार नाही.
हस्तमैथुन करताना आपण मनामध्ये अनेक चित्रे उभारत असतो, अनेक कल्पना करत असतो आणि त्यामुळे आपला हस्तमैथुनाचा वेग वाढतो, अशा परिस्थितीत आपल्या सेक्स करण्याचा स्टॅमिना कमी होतो. जेव्हा आपण आपल्या साथीदारासोबत सेक्स करतो, तेव्हाही पुरुषांचे विर्य लवकर बाहेर येते, जेणेकरून स्त्रीला पूर्ण समाधान मिळण्याआधी पुरुषांचा कार्यक्रम झालेला असतो.
हस्तमैथुन केल्यामुळे, एखादी व्यक्ती स्वतःला समाधानी समजते. मात्र याचा सगळ्यात जास्त परिणाम तुमच्या शरिरावर हळू हळू पडत असतो. इतकच नाही, तर सेक्स करतानाही या सगळ्याच्या परिणामांना सामोरे जावं लागतं. हस्तमैथुन केल्याने जोडीदाराबरोबर सेक्स करण्याची इच्छा देखील कमी होते, ज्यामुळे नातेसंबंधावर दबाव वाढतो.
लिंगासाठी सगळ्यात खराब गोष्ट
एका दिवसात बर्याच वेळा हस्तमैथुन केल्याने पुरुषांचे जननेंद्रियावरही (लिंगावर) वाईट परिणाम होतो. एका अभ्यासानुसार, जेव्हा असे होते तेव्हा पुरुषांच्या लिंगाच्या स्नायूंवर दबाव वाढतो, त्यानंतर ते त्रास देण्यास सुरुवात करतात.
एका अभ्यासानुसार हे उघड झाले आहे की जे लोक दररोज हस्तमैथुन करतात त्यांना सामाजिक जीवनातून अधिक डिस्कनेक्शन होते. यामागील मुख्य कारण म्हणजे कधीही हस्तमैथुन करण्याची त्यांची इच्छा असणे, जी लोकांमध्ये राहत असताना करणे शक्य नाही. हळूहळू त्याचा परिणाम माणसाच्या मानसिक आरोग्यावरही होण्यास सुरवात होतो.
तज्ञांच्या मते, हस्तमैथुन करण्यात कोणतीही हानी होत नाही परंतु ती मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे आहे. तुम्ही रोज समाधान होण्यासाठी हस्तमैथुन करत असाल, तर एक लक्षात घ्या की त्याचे व्यसन लागू शकते आणि व्यसन खूपच वाईट गोष्ट आहे.
हस्तमैथून सोडण्यासाठी काय कराल
हस्तमैथून सोडण्यासाठी तुम्हाला तुमचं मन रोज नव्या नव्या गोष्टींमध्ये रमवावं लागेल. नव्या गोष्टी करण्यात, गाणी ऐकण्यात, पुस्तके वाचण्यात, तुमच्या मनात सतत काही दिवस असे विचार येतील मात्र त्या विचारांना न टाळता त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार करा… ज्यावेळेस तुम्ही हस्तमैथून करता त्यावेळेस एखादी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट करत राहण्याचे सल्ले अभ्यासक देतात.