Vagina Itch after Sex : पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सेक्स केल्यानंतर जर तुमच्या गुप्तांगाला खाज सुटत असेल, तर जास्त अस्वस्थ किंवा काळजी करण्याचं कारण नाही. सेक्स केल्यानंतर जर आपल्या योनीजवळ किंवा लिंगाजवळ खाज सुटत असेल तर याचा अर्थ यीस्टचा संसर्ग होऊ शकतो. (Does a woman’s vagina itch after sex See what is the reason)
ही खाज फक्त सेक्स केल्यावर येते असं नाही, खाज सुटण्यानंतर योनी अथवा लिंगातून काही स्त्राव होतय का हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जर खाज सुटण्यावर काहीच स्त्राव नसेल तर मग समजून घ्या की ही खाज आपल्या जोडीदाराच्या वीर्यमुळे होत आहे. जर हे आपल्यास पुन्हा पुन्हा होत असेल तर आपण स्त्रीरोगतज्ज्ञाकडून तपासणी करून घ्यावी.
सेक्सनंतर लगेचच, जर एखाद्या स्त्रीच्या गुप्तांगाला तीव्र जळजळ होणे, लालसरपणा आणि सूज येणे असं काही होत असेल तर तिने लगेचच तपासणीसाठी स्त्रीरोगतज्ञाकडे जानं गरजेचं आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ तपासल्यानंतरच आपल्याला आपल्या जोडीदाराच्या वीर्यापासून ही खाज आल्याचं सांगितलं जातं.
यावर उपाय काय?
अनेकदा आपलं खाणं योग्य नसतं. खान्यामध्ये अनेक भेसळ होत असते. प्रोटिन आणि हेल्दी खाणं खूपच कमी झालेलं असतं. याचा थेट परिणाम आपल्या सेक्लुअल लाईफवर होत असतो.
लैंगिक आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे आहे, कारण आपल्याला रोगापासून वाचवण्यात आहाराची खूप मोठी भुमिका आहे. दही आणि क्रॅनबेरीचा रस यीस्टच्या संसर्गापासून बचाव करते. जेव्हा आपल्याला योनीमध्ये कोरडेपणा जाणवतो तेव्हा आपल्या आहारात अधिक सोया उत्पादनांचा वापर करा, कारण त्यामध्ये इस्ट्रोजेनचा एक प्रकार आहे, जो शरीरातील तेलाचा थर वाढवण्यासाठी मदत करतो.