Still a Virgin : भारतीय समाजात, अनेकदा मुला-मुलींची अरेंज मॅरेज होत असतात. त्यात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ते दोघेही एकमेकांसाठी अनोळखी असतात. अशीच एका मुलीची शोकांतिका आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जिने तिच्या आईवडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं आणि तीन वर्षे ती व्हर्जीन राहिली. या तीन वर्षांत तिच्या नव्याने तिच्यासोबत एकदाही सेक्स केला नाही.
काय सांगते तरुणी
जेव्हा मी 24 वर्षांची होते, तेव्हा माझ्या घरच्यांनी माझं अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न लावून दिलं. माझं लग्न त्या व्यक्तीशी झालं होतं, ज्याला मी ओळखतही नव्हते, तो देखणा, उंच होता, आणि पहिल्याच भेटीत तो मला खूप गोड वाटला आणि आवडलादेखील. कदाचित मी त्याच्या प्रेमातही पडले होते. जसजसे माझ्या लग्नाचे दिवस जवळ येत होते, तसतशी माझी उत्कंठताही दिवसेंदिवस वाढत होती, एवढच काय तर ‘सुहागरात’ या शब्दामुळेही मी पार घाबरून गेली होती.
मी अजूनही व्हर्जिन होते, माझ्या व्हर्जिनीटीचा सगळा अधिकारी माझ्या पतीसाठी मी राखून ठेवला होता. मला विशालशी लग्न करायचंच होतं, मात्र मला पहिल्या रात्रीची भीती वाटत होती. पण त्या गोड रात्रीचा अनुभवही मला घ्यायचा होता.
लग्नामुळे आम्हाला त्या रात्री कंटाळा आला होता, त्यामुळे आम्ही दोघेही झोपी गेलो होतो. मला थोडासा दिलासा मिळाला, कारण यामुळे आम्हा दोघांना एकत्र येण्यासाठी एक दिवस मिळाला होता. पण दुसर्या दिवशी आणि त्या नंतरचे बरेच दिवस, रात्री माझ्याबरोबर सेक्स करणे किंवा स्पर्श न करण्याऐवजी, तो झोपून जात असे. कदाचित तो स्वत:ला आणि मला लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी एकमेकांना ओळखण्यासाठी थोडा वेळ देत असेल, असंही मला कधी कधी वाटायचं.
विशाल माझी खूप काळजी घेत असे. तो शहाणा, प्रामाणिक आणि खूप बोलणारा होता. चहाचा कप घेऊन त्याच्या शेजारी बसून मला माझ्या लहानपणीच्या आठवणी त्याच्याशी शेअर करायला मला खूप आवडत असे. तो मला गिफ्ट आणि कधीकधी गुलाबही आणत असे. त्याच्या अशा वागण्यामुळे मला खूप आनंद वाटायचा.
आमच्या लग्नाला बरेच महिने निघून गेले, तीरीही विशालने आमच्यातल्या सेक्सबद्दल कधीच विषय काढला नव्हता. विशालने माझ्याशी एकदाही शारीरिक संबंध ठेवले नव्हते किंवा एक किसही केला नव्हता! ते थोडं मला विचित्र वाटत होते, कारण मला माहिती होते की पुरुषांना लैंगिक संबंध ठेवणे आवडते. पण माझ्या बाबतीत तसं काहीही होत नव्हतं. मी त्याच्या जवळ जाण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण प्रत्येकवेळी मीही अपयशी ठरत असे. तो माझी काळजी घेत होता, पण मला हवी असणारी गोष्ट तो मला देत नव्हता.
आता एक वर्ष संपून गेलं होतं, विशालने मला स्पर्शही केला नव्हता. आमच्या लग्नाला एक वर्ष झाले होते, आम्ही लग्न केले होते पण नवरा बायको म्हणून आम्ही अजूनही अपूर्ण होतो आणि कदाचित आमचं लग्न अपूर्ण होतं. नात्यात फक्त काळजी घेणे गरजेचं नसतं, तर आपल्या पत्नीच्या भावना, तिला काय हवं काय नको हेदेखील समजून घेणं गरजेचं असतं, जे विशाल करत नव्हता.
आता तर हद्दच झाली, विशालला परदेशात नोकरी मिळाली, मला इथेच सोडून तो तिकडे निघून गेला. तरीही मी त्याची दिवसरात्र वाट पाहत राहिले, मला अजूनही आशा आहे की या वेळी जेव्हा तो परत येईल तेव्हा तो मला शोधून काढेल, आणि मला समाधान करेल, दुर्दैवाने, ज्या गोष्टी योग्यरित्या घडाव्यात असं मला वाटत होतं, त्याच घडत नव्हत्या. आता तो दीड वर्षानंतरही परत भारतात आला होता, तरीही त्याने मला जवळ केलं नाही.
मला कधी कधी तो पुरुष असण्यावर संशय येत होता. किंवा त्याचे दुसर्यावर प्रेम असल्याचाही अंदाज मी धरत होतो. माझ्या मनात विविध प्रश्न निर्माण होत होते. आता मात्र आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली, तरीही आम्ही अजून एकदाही सेक्स केला नाही. इतकच काय माझी व्हर्जिनिटी मी अजूनही त्याच्यासाठी राखून ठेवली असल्याचं मत सी महिला सांगते.