Along with Women : काही स्त्रिया किंवा तरुणी त्यांच्यासोबत असलेल्या पुरुष किंवा तरुणांशी खूप जवळचं नातं जपतात. त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने राहतात, बोलतात, मात्र त्याच स्त्रियांचं दुसऱ्या स्त्रियांशी कधीच पटत नाही, किंवा इतर स्त्रियांसोबत जास्त सलगीने राहत नाही, असं का, हेच आपण आजच्या लेखात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. (why Women don’t get along with women)
पुरुषांचे प्रेम अव्यक्त होण्यासारख असतं, त्याचबरोबर त्याला कृतीची जोड असते; म्हणजे जर एखादा पुरुष एकाद्या स्त्रीची मदत अव्यक्तपणे किंवा कुठल्याही आभाराची अपेक्षा न ठेवता करत असतो. रेल्वे डब्यात किंवा बसमध्ये एखादी स्त्री आली की ती न सांगता तिला जागा देणे, एखादी महिला अडचणीत असली की तिला मदत करणे, अशा गोष्टी तिच्याकडून होत असतात.
घरातही एकीचा मुलगा, एकीचा नवरा आणि एकीचे वडील, तर बाहेर समाजात कोणाचा तरी मित्र म्हणून एक पुरुष आपलं कर्तव्य निभावत असतो, तो प्रत्येवेळी सर्वांना सांभाळून आणि सामावून घेऊन आपली भूमिका सादर करत असतो. आपल्या टीम मेंबरला किंवा साथीदाराला पुढे घेऊन जाण्यासाठीदेखील पुरुष पुढाकार घेत असतो.
भेद लिंग आकर्षण हा देखील मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे, म्हणजे एका पुरुषाला आपल्या भावना शेअर करण्यासाठी पुरुषांपेक्षा महिलांशी शेअर केलेलं जास्त भावूक ठरतं, अगदी तसच महिलांचं आहे. अनेक महिला आपल्या गोष्टी शेअर करण्यासाठी पुरुष साथीदार शोधत असतात. त्या इतर महिलांशी आपल्या गोष्टी शेअर करताना कचरतात. त्यांना वाटतं की एखादी गोष्ट जर दुसऱ्या महिलेशी शेअर केली तर ती गोष्ट तिसऱ्या कोणाला तरी समजू शकते, मात्र तीच गोष्ट पुरुषांना सांगितली तर ती इतर कोणालाच समजू शकणार नाही, किंवा तोो पुरुष इतर कोणाला सांगणार नाही, अशी समज त्या महिलांची झालेली असते.
प्रत्येक स्त्रीला आपल्यासोबत घडलेल्या घटना, गोष्ट, प्रसंगाचं भांडवल करायचं नसतं, मात्र त्या घटना, गोष्ट, प्रसंगावर एखादं सोल्यूशन नक्की काढायचं असतं, त्यातच त्यांच्या गोष्टीचं सोल्यूशन पुरुष साथीदारांकडून मिळण्याची शक्यता त्यांना 90 टक्के असते, म्हणून अनेक महिला पुरुषांशी सांगड घालत असतात, किंवा त्यांच्याशी बोलत असतात.