तुम्हाला अनेकदा असा अनुभव आलाय का, की तुम्ही सेक्स केलाय आणि तुमच्या त्वचेवर एकदम ग्लो आलाय. अनेकांच्या सोबत असा प्रसंग घडलेला असतो, की सेक्सनंतर आपली त्वचा चमकण्यास सुरुवात होते. त्याला पोस्टकोइटल ग्लो देखील म्हणतात. (glow after sex and this sex benefit stays with you)
सेक्सनंतर तुमच्या वागण्यासह बोलण्यातही अनेकदा बदल जाणवतो. हेच फायदे सेक्सनंतर तब्बल 48 तास आपल्यासोबत राहतात. सायकोलॉजिकल सायन्स जर्नलमध्ये देखील प्रकाशित केले गेले होते; कोणत्या कालावधीत लैंगिक संबंधानंतर उत्तरोत्तर किती काळ टिकेल हे निर्धारित केले गेले आहे.
Lip Kiss : सेक्सची सुरुवात ओठांच्या चुंबनानेच का करतात, जाणून घ्या कारण…
सेक्सॉलॉजिस्ट यांच्या म्हणण्यानुसार सेक्स करताना मोठ्या प्रमाणात शरीरातून ऑक्सिटोसिन बाहेर पडते, हा एक प्रकारचा संप्रेरक आहे, ज्यामुले जोडीदार आपल्याकडे अॅट्रॅक्ट होतो.
मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला, त्यामध्ये नवविवाहित जोडप्यांचा समावेश होता. पहिल्या गटात 96 जोडपी आणि दुसऱ्या गटात 188 जोडप्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना सलग 14 दिवस सेक्स करण्यास, त्यांच्या उत्तेजित पातळीचा वेळ नमुद करण्यास, संपूर्ण सेक्सचा अनुभव नमुद करण्यास सांगण्यात आलं होतं.
Normal frequency of sex : दिवसातून वारंवार सेक्स करणं, पडू शकतं धोक्याचं…
अभ्यासामध्ये असे दिसून आले की ज्या जोडप्यांनी सलग दोन दिवस सेक्स केला, त्या जोडप्यांना खूप मोठ्या प्रमाणात लैंगिक समाधान मिळाले होते, पुढील दिवस त्यांच्या वागण्या, चालण्या, बोलण्यात कमालीची सुधारणा आली होती. चेहऱ्यावर एकप्रकारचे तेज आले होते.
ज्या जोडप्यांनी चांगल्याप्रकारे सेक्स केला, त्यांचा सेक्स आफ्टरग्लो खूप चांगला असल्याचं त्यांनी सांगितलं. चेहऱ्यावर येणारं तेज हे कुठल्याही क्रिम अथवा ट्रिटमेंटपेक्षाही सर्वाधिक चांगलं होतं, असंदेखील ती जोडपी म्हणताना दिसतात. त्यामुळे तुम्हालाही असा ग्लो आणायचा असेल, तर जमेल तितका सेक्स करायला हरकत नाही.
Benefits of Sex Life : सगळ्या आजारांवर सेक्स एक जालीम उपाय, वाचा 10 फायदे