Itching After Sex : अनेकजणांची अशी समज आहे, की सेक्स केल्यानंतर महिलांच्या योनीमध्ये जेव्हा पुरुष आपलं विर्य सोडतो तेव्हा महिलांना जळजळ जाणवते, किंवा खूप कळ येते, अतिसंवेदना होतात. मात्र सेक्स करताना महिलांच्या योनीजवळ जळजळ होण्याची अनेक कारणे आहेत, तीच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. (Is there itching or burning in the vagina after sex?)
पुरुषांच्या विर्यामुळे खाज सुटणे अॅलर्जी झाल्याची भावना निर्माण होणे अशा गोष्टी खूप दुर्मिळ असतात, शक्यतो अशा गोष्टी होण्याचं प्रमाण 100 जोड्यांमध्ये एका जोडीला जाणवतो. अशावेळी पहिल्यांचा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही योग्य, मात्र काही प्रथम गोष्टीही असतात, ज्यामुळे स्त्रीयांच्या योनीमध्ये खाज सुटणे किंवा जळजळ होण्याचे प्रकार घडत असतात, हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सेक्स करताना योनी आणि लिंग यांच्यामध्ये होत असलेलं घर्षण हे जळजळ होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, त्यामुळे थुंडी, पाणी किंवा त्या प्रकारचे तेल पावरणे गरजेचे आहे. एकाचवेळी जास्त प्रमाणात सेक्स केल्यानंतर योनीची जागा कोरडी पडण्यास सुरुवात होते, त्यावेळी योनीचा भाग दुखण्यास सुरु होतो.
What is sex : सेक्स म्हणजे काय, पाहा महिलांना काय वाटतं सेक्सबद्दल..
योनीजवळ जळजळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. सेक्स करताना झालेलं घर्षण, किंवा सेक्सवेळी योनीमध्ये आलेला कोरडेपणा, तुम्ही वापरत असलेला कोंडोम किंवा एखादं तेल, अशा अनेक गोष्टींमुळे महिलांच्या योनीजवळ काहीदा पुरुषांच्या लिंगाला जळजळ जाणवते.
Women Vagina Changes : वाढत्या वयामुळे स्त्रीच्या योनीमध्ये होतात 8 बदल…