compromise : आजकाल अनेकजण आपल्या नात्याबद्दल विचार करत असतात. प्रेम असो किंवा लग्नानंतरचं नातं. अनेकजणांना याचीही खात्रीही नसते की त्यांचं नात किती काळ टिकेल. आता याच नात्यावर बोलण्यासाठी हा लेख सादर करत आहोत. (No relationship lasts without compromise)
सगळ्यांच्या समोर पैसा दिसतोय. सगळ्यांनीच एक गोष्ट मान्य केली आहे की पैशांशिवाय जगात कुठलीच गोष्ट होत नाही, या सगळ्या धावपळीत अनेकांचं अनेकांकडे दुर्लक्ष होत गेलं आणि गेम इथच फसला. धावपळीच्या जगात कोणाला कोणीच आठवेनासे झाले, जे ओळखीचे आहेत त्यांच्याकडेही लक्ष देण्यासाठी कोणाकडे वेळ नाही आणि जे स्वत:च्या रक्ताची आहेत ते जवळ कधी आले नाहीत. अशीच गत अनेकांची झाली आहे.
सगळ्यांची मानसिकचा बदलली आहे. त्यात नवरा बायकोही सुटले नाहीत. आपण जर अभ्यास केला किंवा थोडा विचार जरी केला तरी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल. ती म्हणजे आपल्या आईवडिलांचं असलेलं नात आणि आपलं नातं. आजकालच्या तरुण पिढीचं नातं लगेच तुटतं. मग ते गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड असो किंवा पती – पत्नी असो. इतकच काय भावा-भावांचं नातही अनेकदा तुटून जातं. याचं एकमेव कारण म्हमजे तडजोड न करणे.
तडजोड का करावी?
जरी धावपळीचं जग असलं, सगळ्यांनाच काही ना काही तरी करायचं आहे, खूप काही कमवायचं असलं तरी यात आपली नाती तुटू नयेत, याची काळजी सगळ्यांनाच करावी लागेल. सगळ्यात जास्त प्रेमसंबंध आणि लग्न संबंधांमध्ये अशी नाती जास्त करून टिकत नाहीत, हे प्रामूख्याने आजकाल दिसून येतं.
आपल्या नशिबी मिळालेल्या गोष्टी जर आपण स्विकारल्या नाहीत तर त्यामध्ये भांडण, राग, द्वेष, तिरस्कार सारख्या गोष्टी जन्माला येतात. अनेकजणांची लग्न होतात मात्र कोणाला पती आपडत नाही तर कोणाला पत्नी मनासारखी मिळालेली नसते. काहीजण आधी ज्या व्यक्तीवर प्रेम होतं अशाच व्यक्तींकडे परत जाण्याचं ठरवतात. अशामुळे आपली नाती जास्तकाळ टिकत नाहीत.
लग्न झाल्यानंतर दोघांकडे काही ना काही गोष्टी कमी असतात, मात्र हे आपला जोडीदार समजून घेत नसतो. एकामेकांच्या कमी असलेल्या गोष्टी उकरून काढणे, त्यांवर राग करणे, भांडण काढणे अशा गोष्टी सुरु होतात. अशामुळे आपल्या नात्यात लवकर तूट पडते.
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
आपण आपल्या जोडीदारासाठी किती वेळ देतो, त्यासाठी काय काय केलं, हे बोलून दाखवणे, आपल्या जोडीदारासाठी आपण कसे सर्वश्रेष्ठ आहोत, हे दाखवून देणे, आपल्याशिवाय आपल्या जोडीदाराचं काहीच होऊ शकत नाही, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करणे असं अनेक नात्यांमध्ये होत असतं. यामुळे समोरच्या व्यक्तीकडे त्याचा चुकीचा संदेश जातो, अशामुळे नातं तुटण्याचे संकेत जास्त असतात.
या सगळ्या गोष्टी फक्त आताच्या जनरेशनमध्ये होतात असं नाही, या गोष्टी आधीपासूनच होत आल्यात. मात्र जिथे जिथे या गोष्टी होत राहिल्या, तिथे तिथे तडजोड नावाच्या गोष्टीने सावरून घेतलं.
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शारिरीक सुख. अनेकांना जर आपल्या जोडीदाराकडून शारिरीक सुख मिळालं नाही, तर ते दुसरी वाट शोधण्यास सुरुवात करतात. अशातून अफेअरचा जन्म होतो. शारिरीक सुखासाठीही अनेकदा आपल्याला तडजोड करावी लागते, हे अनेकजण विसरून जातात.
आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमचं नात लाँग टर्मसाठी टिकवायचं असेल, तर प्रत्येक नात्यात तुम्हाला कोणती ना कोणती तडजोड करावी लागेलच. प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तशी मिळणारच नाही, ना तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून मिळेल. मात्र त्याचा अर्थ असा नाही होत की आपल्या जोडीदाराला सोडून देणे.
आजकालच्या तरुण पिढीला तडजोड करता न आल्याने पुर्वीची लग्न टिकत होती आणि आताची लगेच तुटतात.