time to breakup ब्रेक अप होणे, हे आपल्यासाठी नवीन नाही, अनेकांच्या आयुष्यात हा किस्सा आज ना उद्या येतच असतो. काहींच्या आयुष्यात लवकर येतो, काहींच्या आयुष्यात उशीरा येतो. मात्र काहीजण अनेही असतात की त्यांना प्रेम या भानगडीत पडायच नसतंच, मात्र मित्र आणि मैत्रिणींनो हा लेख ब्रेक अप झालेल्या मुलं आणि मुलींसाठी आहे, त्यामुळे ज्यांनी अद्याप प्रेम केलं नाही, त्यांनी या लेखाच्या प्रेमात पडू नये, त्यांनी इतर चावट गोष्टींचा आस्वाद घ्यावा, बाकीच्यांनी इकडे लक्ष द्यावं. (It’s time to breakup show girls do this work)
ब्रेकअपनंतर मुलं काय करतात
ब्रेक अप झाल्यावर मुलांवरही खूप परिणाम होतो, मात्र ते लवकर या गोष्टीतून बाहेर पडतात याला काहीजण अपवाद असतात. ब्रेक अपच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मित्रांमध्ये मिसळणे, पार्टी करणे, फिरायला जाणे, कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असते, फोनपासून लांब राहणे किंवा तासनतास फोनवर गेम खेळणे असे एक ना अनेक पर्याय मुलांकडे उपलब्ध असतात, मात्र हे सगळे पर्याय मुलींकडे उपलब्ध असतीलच असे नाही, मग त्यांच्यासमोर काय पर्याय असतात?
मित्रांशी बोलणे
मुलींचा जेव्हा ब्रेक अप होतो, तेव्हा त्या जास्त करून इतर मुलांशी किंवा आपल्या मित्रांशी बोलत असतात. त्या आपल्या बॉयफ्रेंडची कमी भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या मित्रांशी भरपूर वेळ बोलत असतात. काहीजणी कॉलेजच्या मित्रांना फोन लावतात, तर काहीजण खूप जुन्या मुलांना फोन करून त्रास देत असतात. याच्यात अशा काही मुलींचाही समावेश असतो, की दुसऱ्या बॉयफ्रेंडशी भांडण झालं किंवा ब्रेक अप झाला की त्या पहिल्या बॉयफ्रेंडचा हालहवाला विचारण्यासाठी फोन करतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, तासनतास बोलत असतात.
मित्रांशी बोलताना मुलींचा एकच उद्देश असतो की त्यांचं समोरच्या मुलाने सगळं ऐकावं आणि तिच्यासोबत असणारा बॉयफ्रेंड किती चुकीचं वागला हे समोरच्याला सांगावं.
मैत्रिणींशी बोलणे
अनेकदा मुलींचं इतर मुलींशी पटत नाही, मात्र अशाही काही मुली असतात, ज्यांना प्रत्येक गोष्ट आपल्या जवळच्या मैत्रिणीशी शेअर करावीशी वाटते. मग अंडरगारमेंट्सपासून आपल्या बॉयफ्रेंडसोबतच्या सगळ्या गोष्टी अनेकजणी आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करत असतात. जेव्हा ब्रेक अप होतो, तेव्हादेखील हेच घडतं. ब्रेक अप झालेली मुलगी आपल्या मैत्रिणीशी तासनतास गप्पा मारत असते आणि बोलण्यासारखं वातावरण असेल तर त्यांच्या दोघांमध्ये झालेल्या सगळ्या गोष्टीही ती आपल्या मैत्रिणीला सांगून टाकते.
खरेदी करणे
अनेक मुलींना कपडे, अंडरगारमेंट्स, इतर गोष्टी खरेदी करण्याची खूप सवय असते, मात्र बॉयफ्रेंड असताना त्या गोष्टी मुली खरेदी करू शकत नाही, मात्र जेव्हा त्यांचा ब्रेक अप होतो, तेव्हा त्या मनमोकळेपणाने हव्या त्या गोष्टी (बजेटमध्ये बसणाऱ्या) खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडतात. अशावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मित्रही असतात किंवा मैत्रिणीही असतात. त्या मनसोक्त कपडे खरदे करत असतात आणि घरी आल्यानंतर सगळ्या गोष्टी इतर मैत्रिणींशी शेअर करतात.
पार्ट्या करणे
अनेक मुलींना सहसा पार्ट्या करणे आवडत नाही, मात्र अशा अनेक मुली आहेत, ज्यांना बॉयफ्रेंडपेक्षा पार्ट्या हव्या असतात. अशा मुलींचा जेव्हा ब्रेक अप होतो तेव्हा त्या अनेक पार्ट्या करत असतात आणि मु्द्दामहून सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. पार्ट्यांमधून त्यांना हे दाखवून द्यायचं असतं की ब्रेक अप झाल्यामुळे आपल्याला काही फरत पडलेला नाही आणि आपण दुखीही झालेलो नाही.
फिरायला जाणे
मन हालकं करण्यासाठी फिरणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. ब्रेक अप झाल्यानंतर सर्वाधिक मुली या मार्गाचा अवलंब करतात. ब्रेक अप होतात अनेक डेस्टिनेशनवर फिरायला जाण्याचा विचार मुली करतात, मग ते मित्रांसोबत असो किंवा मैत्रिणीसोबत. मुलींना फिरायला खूप आवडतं. अशाने त्यांना वाटतं की आपल्यासोबत जे झालं आहे, ते सर्व विसरायला मदत होईल, म्हणून अनेक मुली फिरायला जात असतात. काहीजणी आपल्या घरच्यांसोबतही फिरायला जातात.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होणे
आपला ब्रेक अप झालेला आहे आणि आपण आता स्वातंत्र आहोत हे दाखवून देण्यासाठी अनेक मुली सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होतात. रिलेशनशिपमध्ये असताना अनेक मुलींना सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यासाठी बॉयफ्रेंड मज्जाव करतो, मात्र ज्यावेळी त्याच बॉयफ्रेंडसोबत ब्रेक अप होतो, तेव्हा त्या मुक्त झालेल्या असतात आणि हमखासपणे फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर अक्टिव्ह होतात.
या गोष्टींव्यतिरिक्तही ब्रेकअपनंतर मुली काय करतात, हे तुम्हाला माहित असेल तर कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा आणि अनेक जिवनावश्यक गोष्टींसाठी वाचत राहा, चावट गोष्टी.
हेही वाचाच…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…