मित्र बनून
प्रियकर बनणं सोप्प,
प्रियकर बनून नवरा बनणं, हे त्याहूनही सोप्प…
कठीण असतं ते…!!
नवरा बनून प्रियकर म्हणून राहणं,
आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं…
हे जेव्हा आणि ज्याला जमतं
त्या नवऱ्याला
सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची
आणि बायकोला
समजून घेणाऱ्या मित्राची गरजच भासत नाही…
after married आजकाल लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपला बार उडवून दिला आहे. कमी खर्च, कमी लोकांमध्ये ना कुठला गाजावाजा, ना कुठलं मोठं नियोजन, अशा सगळ्या परिस्थितीत लॉकडाऊन संपण्याची वाट न बघता अनेकांनी आपल्या लग्नाचा बार उडवून दिला आहे. त्यात लॉकडाऊनमध्ये एकट पडलेल्यांनी तरी आपली गडबड उरकून घेतली आहे, मात्र सगळ्यांसमोर एक प्रश्न ठाम उभा आहे. (Do these things with your wife after married)
फक्त प्रेम करत असताना मोबाईलवरून जेवलीस का विचारणं खूप सोप्प असतं किंवा वेळेत जेव, वेळेत कामावर जा, कामावरून घरी ये, घरी आल्यावर फ्रेश हो असं बरच काही चालू असतं मात्र मुद्दा हा आहे की त्या दोघांचं लग्न झाल्यावर आणि एकत्र राहताना तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कसे राहता. चला तर मग लग्न झालेल्यांनो आणि न झालेल्यांनो सगळ्यांसाठी हा लेक समप्रित करतो.
प्रेमाने बोलणे
प्रेम करत असताना अनेक प्रेमाच्या गोष्टी होत असतात मात्र लग्न झाल्यानंतर या गोष्टी दोघेही विसरून जातात. कामाचा तणाव, एकमेकांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींमुळे झालेले वाद, झालेली चिडचिड अशा गोष्टींमुळे प्रत्येकाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रेमाच्या आधी जसं आपण वागतो तसंच लग्नानंतरही वागणं खूप गरजेचं आहे. आपल्या जोडीदाराबरोबर आपण जेव्हा प्रेमाने बोलतो तेव्हा समोरचाही व्यक्ती आपल्यावर भरपूर जीव लावतो.
जेवण एकत्र
प्रेम वाढवण्यासाठी आणि विश्वास संपादन करण्यासाठी अनेक गोष्टी एकत्र करणे खूप गरजेचं आहे. त्यात जेवन हादेखील विषय तितकाच महत्त्वाचा आहे. एकत्र जेवण केल्याने एकमेकांशी बोलणं होतं, समजूतदारपणा वाढतो, जेवण करणे ही एक अशी प्रक्रिया आहे, जेव्हा जेवणं सोडून दुसरी कुठलीच गोष्ट आपल्या डोक्यात चालत नाही, त्यामुळे जेवण करताना आपण आपल्या जोडीदारासोबत गप्पा मारू शकतो, अनेक गोष्टी बोलू शकतो, अनेकदा बायकोने केलेल्या जेवणाचं कौतुकही करण गरजेचं आहे. दिवसातून एकवेळ तरी एकत्र जेवण होणे, गरजेचे आहे.
एकत्र राहणे
प्रत्येक स्त्रीला जोडीदार आणि प्रेमाची खूप गरज असते, आपल्या जोडीदाराने आपल्या सोबत राहावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं मात्र अनेकदा तसं होतं नाही. एकत्र न राहिल्याने महिलांना राग, ताणतणाव, चिडचिडापणा येत राहतो. त्यामुळे अनेक स्त्रिया जोडीदाराला सोडून देण्याचा निर्णयही घेत असतता, त्यामुळे आपल्या महिला जोडीदाराची समजूत काढून एकत्र राहण्याचा प्रयत्न जास्त वेळ करा.
खूप बोला
आपल्या बायकोला वाटत असते की आपल्या जोडीदाराने आपल्याशी खूप बोलावे, मात्र अनेकजण शांत राहतात. मात्र महिलांना खूप बोलणारे, त्यांच्यासोबत सतत बडबड करणारे पती आवडतात. यावर काही ना काही विषय काढून बोलत राहणे, हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आपणही मोकळं होतो आणि महिलाही आपल्याशी खूप मोठ्याप्रमाणात खूलतात.
दिवसभराच्या गोष्टी सांगा
महिलांशी सतत बोलत राहण्यासाठी तुम्ही वाटल्यास तुमच्या ऑफिसमधल्या गोष्टी तिच्याशी शेअर करू शकता.दिवसभऱ ऑफिसमध्ये काय झालं, कोण काय बोललं, आपल्या टार्गेटबद्दल पत्नीशी बोलत राहा, त्यामुळे तुम्हीही मोकळे होता आणि काही गोष्टी शेअर केल्यामुळे पत्नीलाही विश्वास मिळतो. सगळ्या गोष्टी पती आपल्याशी शेअर करतो, या एका समाधानावर महिला जगत असतात.
कंटाळा करू नका
सेक्स असो वा इतर कुठली काम, आपल्या पत्नीसोबत करताना कुठल्याही गोष्टीचा कंटाळा करू नका, त्यामुळे पत्नी स्वत:ही आळशी होईल, किंवा कंटाळा केलेला अनेक महिलांना आवडत नाही, त्यामुळे थोडं का होईना, पण पत्नीला हवंहवंस वाटणारं सगळं काम करण्याचा प्रयत्न करा.
तिच्यासाठी गिफ्ट द्या
अनेक महिला पैशांचा विचार करत नाहीत, मात्र त्यांच्यासाठी एक छोटसं का असे ना, पण गिफ्ट आणल्याने त्या खूप खूश होतात. आपल्या गडबडीतूनही वेळ काढून पती आपल्याला गिफ्ट आणतो, हीच त्यांच्यासाठी वेगळी गोष्ट असते, अशामुळे पत्नी भलतीच खूश झालेली असते.
कुठेतरी जवळ फिरायला जा
पत्नी जर हाऊसवाईफ असेल तर हा पर्याय करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या पत्नीला जवळच का होईना पण आठवड्यातून एकदा तरी फिरायला घेऊन जा, रोजच्या वातावरणातून थोडं मोकळीक मिळवण्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे. आठवड्याच्या थकव्यामुळे थोडं फ्री होणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जा, तिथे मनमोकळेपणाने बोला, तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागण्याची ही एकमेव वेळ असते.
रोज तब्येतीची विचारपूस करा
महिलांना वाटत असतं की आपली कोणीतरी विचारपूस करावी, आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, मात्र अनेक पतींकडून ही गोष्ट राहून जाते, त्यामुळे सर्वात आधी तुम्ही तुमच्या पत्नीची काळजी घ्या, विचारपूर करा, कुठे दुखत, कुठे खुपतय, काय त्रास होतोय, हे सगळं विचारत चला, अशा गोष्टींमुळे सतत ती फ्रेश राहील, आणि कोणते आजारही तिला होणार नाहीत.
या आणि अशा अनेक गोष्टी कराल, तर तुम्ही तुमच्या पत्नीचं खूप सारं प्रेम मिळवाल, अशामुळे तुमच्या संसारात कधीच दु:ख येणार नाही. या गोष्टींव्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहित असेल, तर कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा आणि अनेक जिवनावश्यक गोष्टींसाठी वाचत राहा, चावट गोष्टी.
हेही वाचाच…
सेक्सवेळी या 6 स्टेप्स करा, पार्टनर अंथरूण सोडणार नाही…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…