सलमान खानने वापर केला, तरीही करते सलमानवर प्रेम, अजून आहे अविवाहितसलमान खानवरून जीव ओवाळून टाकणाऱ्या हजारो तरुणी अनेक ठिकाणी भेटतील. ही गोष्ट काही नवीन नाही. चक्क बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींनीही सलमानवर खुलेआम प्रेम केलं होतं. अनेक अभिनेत्रींनी सलमानसोबत काम करण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवली होती. मात्र अनेक अभिनेत्री यामध्ये असफल राहिल्या.
संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ अशा अनेक अभिनेत्रींचं नाव आज सलमानसोबत जोडलं जातं. या सगळ्यात अजून एक नाव आहे ते म्हणजे सोमी अली. सोमी अलीचा इतिहास खूपच रंजक आहे. सलमानसाठी तिने काय काय केलं, हाची यादीच आता जाहीर होणं बाकी आहे.
सोमी अली ही मुळची पाकिस्तानची आहे. सोमीची आई इराकी तर वडील पाकिस्तानचे आहेत, त्यामुळे तिचं वास्तव काहीवेळ पाकिस्तान तर काहीवेळ फ्लोरिडाला झालं आहे. सलमानवर प्रेम करत असताना ती अनेक वर्ष भारतातही राहिली आहे. समलामनवर सोमीने वेड्यासारखं प्रेम केलं होतं, आणि आताही ती करत आहे.
‘मैंने प्यार किया’ या चित्रपटानंतर सोमी सलमानच्या प्रमात पडली आणि त्याच्यासोबतच लग्न करण्याचं सोमीने ठरवलं. सोमीच्या आंधळ्या प्रेमामुळे आईने सोमीला मुंबईत एकटं पाठवलं. बॉलिवूडपेक्षाही सोमीला सलमान खूप गरजेचा होता. केवळ १६ वर्षांची असताना सोमी मुंबईत एकटी आली आणि सलमानचा शोध सुरु केला.
मुंबईत मॉडेलिंग करत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची संधी सोमी शोधू लागली. अखेर तिला एका चित्रपटात काम मिळालं. त्याचवेळी ती सलमानला भेटली आणि मनातील सगळी इच्छा स्पष्ट बोलून दाखवलं.
सलमान माझा पहिला आणि आतापर्यंतचा बॉयफ्रेन्ड असल्याचं सोमी सांगते. त्याच्यासाठीच मी बॉलिवूडमध्ये आले, त्याच्याकडून खूप शिकले, त्याच्यासोबत आयुष्याची खूप मजाही केली. सलमानसोबत 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचं सोमी सांगते. 1991 ते 1997 या काळात सोमीचे 10 चित्रपट गाजले… मात्र 1999 मध्ये सलमान आणि सोमीचा ऐश्वर्या रायमुळे ब्रेकअप झाला. सोमीला ब्रेकअपचा इतका धक्का बसला की चक्क सोमीने बॉलिवूड सोडले.
सोमी आता शिक्षणासाठी फ्लोरिडाला गेली आणि सायकॉलॉजीचे शिक्षण घेतले. ती आता अनेक डॉक्युमेंट्रीवर काम करते. महिलांच्या आयुष्यावर काही लघुपटही तिने बनवले आहेत. 2006 मध्येही असाच एक महिलांच्या अधिकारांवर अधारित एक लघूपट तिने बनवला होता, जो खूप गाजला…
सोमी अली आजही सलमानवर तितक प्रेम करते, जितकं आधी करायची. अजूनही सोमी सलमानसाठी अविवाहीत आहे. सलमानला दिलेलं वचन ती आजही पाळत आहे. तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं की सलमानने माझा 8 वर्षे वापर करून सोडून दिलं, मात्र आजही सलमानच्या परतन्याच्या आशेने ती आजही सिंगल आहे.