मुंबईला चंदेरी दुनिया म्हटलं जात, मात्र याच दुनियेत अनेक काळे धंदे चालतात, हेही विचरून चालणार नाही, असाच एका काळ्या धंद्याची उकल मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने केली आहे. एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात क्राईम पोलिसांना यश आलं आहे.
मॉडेल आणि टिव्ही सिरीअलमधील अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यापैकी एक अव्वल मॉडेल आहे आणि तिने अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केल्याचंही समोर आलं आहे, तर दुसरी अभिनेत्री टीव्ही मालिकांमध्ये काम करत असल्याचंही समोर आलं आहे.
या दोघी दोन तासांसाठी दोन लाख रुपये चार्ज करत असतं. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दोघींना जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून पकडले आहे. या मॉडेल आणि अभिनेत्रींना मुंबई पोलिसांनी अटक केली नाही, पण त्यांना सेक्स रॅकेटच्या तावडीतून सोडवलं आहे. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अटक केल्यानंतर चौकशीत मुख्य महिलेने सांगितले की गेली अनेक वर्षे ती हे सेक्स रॅकेट चालवत आहे. ती दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत असते. यामध्ये ती स्वत:च कमिशन म्हणून 50 हजार रुपये घेते तर उरलेले दीड लाख रुपये संबंधित मॉडेल आणि अभिनेत्रीला देत असते.
चौकशी दरम्यान, मॉडेल आणि अभिनेत्रीने सांगितले की कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे शूटिंग थांबले होते, काम उपलब्ध नव्हते. म्हणूनच ती सेक्स रॅकेटमध्ये सामील झाली. हे रॅकेट अशा प्रकारे चालत असे ज्यामध्ये ईशा खान ग्राहकांशी संपर्क साधत असे. ती मॉडेल, अभिनेत्री आणि कॉल गर्ल्सची प्रोफाइल आणि छायाचित्रे ग्राहकांसोबत शेअर करायची. ज्या ग्राहकांना आवडले त्यांच्यासोबत दर, तारीख आणि वेळ निश्चित करायची. मग जुहूसारख्या पॉश भागात असलेल्या हॉटेल्समध्ये खोल्या बुक केल्या जात असत. त्यानंतर मॉडेल त्या खोलीत पाठवल्या जायच्या.
खोटा ग्राहक तयार करून मुंबई गुन्हे शाखेने एक साफळा रचला. ईशा खानला सांगितले की आपल्याला आणि आपल्या मित्राला दोन टॉप मॉडेल हव्या आहेत. यानंतर ईशा खानने व्हॉट्सअॅपवर अनेक फोटो पाठवले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोन मुलींचे फोटो निवडले. त्यापैकी एकाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे आणि दुसऱ्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
ईशा खानने प्रति मुलगी दोन तासांसाठी दोन लाख रुपयांमध्ये करार निश्चित केला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या कराराला हो म्हटले. जुहू हॉटेल देखील बुक केले होते. गुरुवारी रात्री महिला दलाल, मॉडेल आणि अभिनेत्री हॉटेलच्या बाहेर पोहोचताच. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.