मित्र- मैत्रिणींनो आपण सेक्स करायच्या वयात खूप धावपळ करत असतो, ती करावीच लागते, त्यापेक्षा दुसरा पर्याय आपल्याकडे नसतो. कारण आपण लग्न, नोकरी किंवा व्यवसाय आणि मुलांचा विचार एकदम करत असतो. अशात आपल्या तब्येतीमध्ये अनेक बदल होत असतात, ते बदल कधी कधी आपल्याला दिसून येत नाहीत, त्याच बदलावर आणि त्याचा सेक्सवर होणाऱ्या परिणामावर आज आपण बोलणार आहोत.
खराब जीवनशैलीमुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरे प्रमाण नेहमी वाढत असते. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळए हृदयविकाराचा धोकाही वाढतो, पण ते इथपर्यंत मर्यादित राहत नाही, तर त्याचा सेक्सच्या स्टॅमिनावरही परिणाम होतो. फक्त सेक्सवर परिणाम होतो असंही नाही तर त्याच्याही पुढे आपण जेव्हा बाळाला जन्म देण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला मोठे परिणाम भोगावे लागता.
रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलचे कनेक्शन
जर्नल ऑफ मेटाबॉलिक सिंड्रोमनुसार, साखर आणि कोलेस्ट्रॉल हे आजार एकमेकांशी जोडलेले असतात. साखर आणि इतर कार्बोहायड्रेट्स खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड्स वाढतात आणि कोलेस्ट्रॉल कमी होते. या आजाराचे प्रमाण वाढत गेले तर आपल्या अनेक रक्तवाहिन्या बंद होण्यास सुरुवात होते. त्याचाच शेवटचा टप्पा म्हणजे हृदयविकाराचा धक्का.
दुसरीकडे, जेव्हा कोलेस्टेरॉलची पातळी वाढत जाते, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी दुप्पट वेगाने वाढत असते. या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत डायबेटिक डिस्लिपिडेमिया असं म्हणतात. या प्रक्रियेचा परिणाम पचनसंस्था, मानसिक आरोग्य, हृदयाचे काम, पुनरुत्पादक प्रणाली (reproductive system) वरही याचा परिणाम होतो, म्हणजे सेक्स आणि तुमच्या स्पर्म काऊंटवर फरक पडत असतो.
लेट प्रेग्नेंसी
यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इथे झालेल्या एका संशोधनानुसार ज्या महिलां पार्टनरमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते, त्यांना गर्भधारणेसाठी सर्वात जास्त वेळ लागतो. त्याच वेळी, जास्त कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या महिलांच्या प्रजनन क्षमतेवर अधिक परिणाम होतो.