तणावामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास होत असतो, याचा तुमच्या नात्यावरही खोल परिणाम होत असतो. प्रत्येक नात्यात दुरावा किंवा जवळीत, ते नातं खूप नाजूक असतं. तणावामुळे अनेकदा तेच नातं तुटण्याच्या मार्गावर असतं.
नाते मजबूत करण्यासाठी, आपल्या जोडीदाराचे कौतुक किंवा आभार माणणं गरजेचं असतं. तज्ज्ञांच्या मते, जोडीदाराचे कौतुक किंवा आभार माणले तर नातेसंबंध मजबूत होऊ शकतात.
जोडीदारासोबत बेडरूमचा अनुभव खराब होत आहे तर अशा प्रकारे उत्साह वाढवा
स्त्रियांसाठी त्यांच्या जोडीदारांसोबत प्रणय सुरू करण्यासाठी येथे काही सर्जनशील मार्ग आहेत
आत्मसन्मान वाढणे
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे कौतुक करता तेव्हा ते तुमच्या दोघांसाठी स्वाभिमान वाढवण्यासारखं असतं. प्रशंसा केल्याने तुमच्या जोडीदाराचा तुमच्या आयुष्यात किती सहभाग आहे, हे लक्षात येते आणि त्या बदल्यात जोडीदार तुमचे कौतुक करू लागतो. यामुळे दोघांमधील नाते अधिक घट्ट होऊ शकते.
तणाव दूर होतो
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे कौतुक करता तेव्हा तुमच्या नात्यात सकारात्मकता येते. ही सकारात्मकता तुमच्या जीवनातील तणाव कमी करण्यास आणि आत्मविश्वास वाढविण्यात मदत करत असते.
पुरुषांच्या शरीरात हे 5 हॉट स्पॉट आहेत, त्यांना स्पर्श करताच उत्साहाची पातळी वाढते
Relationship Tips: नातं मजबूत ठेवण्यासाठी ‘या’ 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या…
भावनिक वातावरण
एकमेकांचं कौतुक करणे आणि आभार माणणे यामुळे नाते अधिक घट्ट होऊ शकते. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती असता तेव्हा तुमच्यावर अधिक भार असतो. यावेळी कौतुक केल्याने भावनिक रित्या अजून त्या व्यक्तीच्या जवळ जाता.
हेल्दी रिलेशनशिप
तुम्ही केलेल्या कौतुकामुळे तुमचा जोडीदार आनंदी होतो. आनंदी झाल्यामुळे तुमच्या नात्यात भांडणे कमी होतात, यामुळे तुमचं नात हेल्दी राहतं.