विवाहित जोडप्यामधील नातेसंबंध मजबूत होण्यासाठी जवळीक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय कपल्समध्ये सेक्सबद्दल एक्साइटमेंटही तेवढीच महत्त्वाची आहे. पण जोडप्यांच्या ‘या’ 5 चुका सेक्स लाइफ उध्दवस्त करू शकतात.
१. ताण
जास्त ताण घेतल्यामुळे तुमच्या सेक्स लाइफवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तणावामुळे तुमच्यामध्ये हार्मोन्स तयार होत नाहीत. त्यामुळे लैंगिक जीवन संपुष्टात येऊ शकते.
सकाळी सेक्स करणे, किती योग्य? फायदे जाणून घ्या
Relationship Tips: आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत झालेलं लग्नही का मोडतं, काय आहेत कारणं…
२. सेक्सबद्दल खुलेपणाने बोलत नाही
अनेक जोडपे सेक्सबद्दल आजही खुलेपणाने बोलत नाही. एकमेकांना आपल्या सेक्सबद्दलच्या भावना बोलून दाखवत नाहीत किंवा त्या समजून घेत नाहीत. त्यामुळेही तुमच्या सेक्स लाइफवर परिणाम होतो.
३. अपुरी झोप
वाढता तणाव आणि अपुरी झोप यामुळेही सेक्स लाइफवर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे शरीर थकलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा राहत नाही.
Relationship Tips: लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपचं नातं कसं टिकवायचं, फक्त 5 उपाय
उन्हाळ्यात जोडीदारासोबत रोमान्स करताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर हॉस्पिटलमध्ये पोहोचाल
४. सेक्स आनंदाने करत नाही
सेक्स हे आनंदाने करण्याची गोष्ट आहे. ज्यामध्ये फोरप्ले आणि वेगवेगळया पोझिशन्सचा केल्यानंतर त्यात आनंद टिकून राहतो. नाही तर सेक्सचा कंटाळा येतो आणि कालांतराने त्यातील रस निघून जातो.
५. सतत वाद
सततची भांडणे आणि वादावादीमुळे ही सेक्स लाइफ संपुष्टात येतं. नवरा बायको म्हटलं की भांडण होणार पण ते लवकर मिटवता आलं पाहिजे.