Girlfriend Death News : बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलेल्या महिलेची घरी प्रत्येकजण वाट पाहत होता. पण अचानक घरातील एक फोन वाजला आणि कुटुंबातील सर्वांची घाबरगुंडी उडाली. फिरायला गेलेल्या महिलेच्या मृत्यूची माहिती समोर आली. (woman go outdore with BF, news of death came home)
पश्चिम बंगालच्या हुगलीमध्ये एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. आहे. नवऱ्यापासून घटस्फोट झाल्यानंतर ही महिला आपल्या माहेरी राहात होती. तिथल्या आपल्या प्रियकरासोबत संबंधित महिला बाहेर फिरण्यासाठी गेली होती, त्यानंतर कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची माहिती मिळाली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आश्वासन
पोलिसांनी महिलेच्या मृत्यूची अपघाती निधन म्हणून नोंद केली आहे. मात्र महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या घटस्फोट घेतलेल्या पतीवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे कुटुंबियांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महिलेच्या पहिल्या पतीनेच हा खून केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या केसमध्ये योग्य तो न्याय दिला जाईल, अशी माहिती दिली आहे.
म्हणून झाला घटस्फोट
हुगळीच्या इमामबाडा भागातील रहिवासी असलेल्या महिलेचे चुचुडाच्या रवींद्र नगर भागात राहणाऱ्या विक्रमदाससोबत प्रेम संबंध होते. त्या दोघांच्या प्रेमाचे लग्नामध्ये रुपांतर झाले.
लग्नानंतर दोघांमध्ये अनेक गोष्टींना घेऊन वाद होत होते, काहीदा या वादाचे कारण हुंडादेखील होते. विक्रमदास अनेकदा महिलेकडे हुंड्याची मागणी करत होता, यावरून महिलेला मारहाणदेखील होत असे. याा कारणामुळे महिलेने आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेतला होता.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार
पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींची चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे शनिवारी (15 मे रोजी) संबंधित महिला आपल्या दोन मैत्रिणी आणि नव्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी दिल्ली रोडला गेली होती. त्यावेळी दोन मैत्रिणी एका स्कुटीवर तर नव्या प्रियकरासोबत संबंधिक महिला बाईकवरून फिरण्यास गेले होते. त्याचवेळी नियंत्रण सुटल्याने त्यांच्या बाईकचा अपघात झाला. यावेळी मागे बसलेली महिलेचा रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू झाला तर बाईकस्वार गंभीर जखमी आहे. (Girlfriend Death News)