women reject sex : वैवाहिक संबंध राखण्यासाठी सेक्स खूप महत्वाचा आहे. दोन जोडीदारांमध्ये अनेकदा भांडणे होत असतात. भांडण, राग यांच्यामुळे प्रेम वाढतेदेखील आणि सेक्युअर लाईफही टिकून राहते. मात्र अनेकदा नात्याला खूप दिवस झाले की नात्याची आस किंवा मोह आणि आकर्षण कमी होऊ लागते, पत्नीला आता पतीसोबत सेक्स नको असतो, किंवा पतीलाही जवळ जाणे कंटाळवाणे वाटू लागते, असं का होतं, याचच कारण आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जर आपली पत्नी आपल्यावर रागावली असेल किंवा घरात असमाधानी वाटली असेल तर, ती संभोग करण्यास अजिबात तयार नसते. यावेळी पुरुषांना स्त्रीला नेमकं काय वाटतं, याचा विचार करणे गरजेचं आहे, त्यासोबतच महिलेने सांगितलेल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जर आपली पत्नी सेक्स करण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. एकतर म्हणजे तु्म्ही तिला दिलेलं वचन मोडला असाल किंवा तिच्याशी विश्वासघात केला असाल. जर आपल्याला हा वाद मिटवायचा असेल तर तुम्ही केलेल्या चुकीची जाहीरपणे माफी मागा. केलेल्या चुका तपासा, आपल्या पत्नीची दिलगिरी व्यक्त करा आणि तिचा विश्वास परत मिळवा.
पुरुष आणि स्त्रियांमधील शारीरिक हार्मोन्स वयानुसार बदलत जातात. हार्मोन्सचे हे चढउतार महिलांच्या लैंगिक ड्राइव्हवर परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत, अनेक महिला सेक्स करण्यासाठी नकार देतात, त्यामुळे आधी स्त्रीकडे तुम्ही आकर्षित व्हा, तीला मोहीत करा, तिला आरामदायक वाटेल असं काही तरी करा, तेव्हा स्त्रीदेखील तुमचयासोबत सेक्स करण्याचा प्रयत्न करेल.