Women Vagina Changes : तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल, तर ती आज पहिल्यांदा जाणून घ्या. ती गोष्ट म्हणजे महिलांची योनीमध्ये वेळोवेळी बदल होत जातात. जसजसे स्त्रिया वयस्कर होत जातात तसतसं त्यांच्या योनीमध्येही मोठे बदल करतात. (With age, a woman’s vagina changes)
केवळ वयानुसारच नाही, तर स्त्रियांच्या योनीमध्ये बदल होण्यासाठी अनेक प्रसंग कारणीभूत ठरतात. हे सर्व बदल अगदी सामान्य आहेत. तर हेही तुमच्या बाबतीतही होत असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही.
बदल काही स्त्रियांमध्येच नाही, तर सर्व महिलांच्या योनीमध्ये होतो. आज आपण त्या बदलांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेव्हा महिला 30 ते 40 वर्षांच्या वयाची होते, तेव्हापासून स्त्रियांच्या योनीमध्ये बदल होण्यास सुरुवात होते.
पौगंडावस्थेपासूनच स्त्रियांच्या योनीत बदल होतात, परंतु जेव्हा स्त्री 40 वर्षांची होते, तेव्हा तिच्या योनीची स्थिती पूर्णपणे बदलते. इतकेच नाही तर मासिक पाळीच्या काळातही स्त्रियांच्या योनीत बदल होतात. हे बदल कसे घडतात ते जाणून घेणे गरजेचे आहे.
तरुणपणातही स्त्रियांच्या योनीत बदल दिसून येतात. या दरम्यान, महिलांच्या योनीचा लॅबिया पूर्वीपेक्षा मोठा आणि दाट होतो. स्त्रियांच्या योनीचा लॅबिया तरुण काळात सहज दिसतो. हा असा काळ आहे जेव्हा स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल होत असतात. याच काळात स्त्रियांचे स्तनदेखील वाढतात. यावेळी महिला सेक्स करत असतात. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे महिलांना भीती वाटते, परंतु असे होणे सामान्य आहे.
वय जसजसं वाढत जाते, तसतसं योनीमध्ये मोठे बदल होत जातात. तरुण वयामध्येतर अनेक शाररिक बदलांमुळे ही गोष्ट जाणवून येत नाही. या दरम्यान, योनीचा बाह्य थर संपूर्ण योनीला व्यापलेला असतो. तर वाढत्या वयानुसार, जननेंद्रियांखालील चरबी कमी होण्यास सुरवात होते.
योनीचा रंगाबाबतदेखील हेच साध्य आहे. जसजसे तरुणींचं वय वाढत जाते, तसतसे स्त्रियांची योनी गर्भधारणेसाठी तयार होऊ लागते. या दरम्यान काही हार्मोनल बदल असे होतात की योनीच्या आतील बाजुचा रंग बदलतो. त्याचा रंग आतून काळा होऊ लागतो. काही काळानंतर हा रंगही गडद होतो.
मासिक पाळी दरम्यान स्त्रियांच्या योनीतही बदल होतो. या दरम्यान, हार्मोनल बदलांसह योनीमध्येही बदल होतात. जेव्हा स्त्रिया त्यांच्या गुप्तांगावरील केस काढतात, तेव्हादेखील योनीमध्ये बदल झालेले जाणवतात. कारण योनीवरील केस स्वच्छ करण्यासाठी महिला विविध उपचार करतात. लेजर ट्रीटमेंटचाही वापर केला जातो.